Monday, March 16, 2026

अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँकेला ‘शेड्यूल्ड बँक’ दर्जा प्राप्त

अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँकेला ‘शेड्यूल्ड बँक’ दर्जा प्राप्त

नगर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन दशकांनंतर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना ‘शेड्यूल्ड बँक’चा दर्जा देण्यास सुरुवात केली असून, याअंतर्गत महाराष्ट्रातील अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेला हा मान देण्यात आला आहे, अशी माहिती बॅंकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांनी दिली.

बुधवारी जारी करण्यात आलेल्या गॅझेट अधिसूचनेद्वारे, मर्चंटस बँकेचा समावेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम, 1934 च्या दुसऱ्या अनुसूचीत करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

‘शेड्यूल्ड बँक’चा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना आरबीआय च्या विविध सवलती उपलब्ध होणार आहेत. यामध्ये लिक्विडिटी फॅसिलिटीज, क्लिअरिंग हाऊस सिस्टीममध्ये सहभागी होण्याचा हक्क, तसेच शासकीय प्रकल्पांना कर्ज देण्याचा अधिकार यांचा समावेश आहे. यामुळे बँकेची विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात मोठी वाढ होणार आहे.

मर्चंटस बॅंकेने नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. संस्थापक चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांच्या नेतृत्वाखाली बॅंकेची घोडदौड कायम असून त्यांच्या नेतृत्वाखाली बॅंकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या दिनांक ३१ मार्च २०२५ अखेर एकूण ठेवी १४६२ कोटी १६ लाख,एकूण कर्जे ९६८ कोटी ३९ लाख , निव्वळ नफा ७ कोटी ३ लाख, बँकेचा सी आर ए आर १५.७५ व नेट एन पी ए ०.०० टक्के आहे. सर्वोत्कृष्ट बॅंकिग सेवा देत मर्चंटस बॅंकेने अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक बॅंकिंग सेवा ग्राहकांना दिल्या आहेत. श्येडुल्ड बँकेचा दर्जा मिळणे ही बॅंकेसाठी ऐतिहासिक उपलब्धी आहे अशी भावना हस्तीमलजी मुनोत यांनी व्यक्त केली आहे.

ही सुधारणा आणि मान्यता केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकारामुळे शक्य झाली आहे. सध्या देशभरात एकूण 1,423 अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका आहेत, ज्यांचा एकत्रित व्यवसाय 4.13 लाख कोटींच्या आसपास आहे. यापैकी आता 52 बँका ‘शेड्यूल्ड बँक’ म्हणून मान्यताप्राप्त आहेत. ज्यामध्ये अहमदनगर मर्चंट्स बँकेचा समावेश झाला आहे.

या उपलब्धीबद्दल व्हाईस चेअरमन अमित मुथा व सर्व संचालक मंडळाने आनंद व्यक्त केला आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles