Saturday, March 14, 2026

अहिल्या नगर मनपा आरोग्य अधिकारी दमदाटी प्रकरण; मनपा कर्मचारी संघटना आक्रमक

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दमदाटी केल्याच्या निषेधार्थ मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने निदर्शने

मनपा अधिकारी कर्मचारी यांना दमदाटी,शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून कारवाईची मागणी – सचिव आनंद वायकर

अहिल्यानगर : महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी कामकाजात हस्तक्षेप करीत दमदाटी केली कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असल्यामुळे मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन न करता निषेध सभेचे आयोजन केले होते, यामध्ये सचिव आनंद वायकर म्हणाले की, महापालिकेमध्ये अधिकारी कर्मचारी काम करत असताना त्यांना दमदाटी, धक्काबुक्की, शिवीगाळ करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहे यावर आळा बसणे गरजेचे आहे डॉ. राजुरकर यांच्या संदर्भात घडलेल्या प्रकारामध्ये पोलिसांनी व मनपा प्रशासनाने आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मदत केली, व संबंधितावर गुन्हा देखील दाखल केला आहे अशा घटना घडू नये यासाठी मनपा प्रशासनाने कामकाजामध्ये नियमावली करून द्यावी व कर्मचाऱ्यांनी देखील आपल्याला दिलेल्या कामाची जबाबदारी ओळखून काम करावे आणि नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करावा नागरिकांशी बोलताना देखील कर्मचाऱ्यांनी प्रेमाने आपुलकीने बोलावे आपली संस्था ही नगरकरांची असून आपण सर्वजण मिळून शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू मात्र अशा घटना होऊ नये याची जबाबदारी सर्वांनीच घेणे गरजेचे आहे विनाकारण अधिकारी कर्मचारी यांना त्रास देणे योग्य नाही युनियन कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असल्याचे प्रतिपादन सचिव आनंद वायकर यांनी केले
मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजुरकर यांना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दमदाटी केल्याच्या निषेधार्थ मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, शहर अभियंता मनोज पारखे, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, अस्थपणा विभाग प्रमुख मेहेर लहारे, कार्याध्यक्ष नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, विठ्ठल उमाप, महादेव कोतकर, बाबासाहेब राशीनकर, उपाध्यक्ष अमोल लहारे, भास्कर अकुबत्तीन, प्रफुल्ल लोंढे, अजित तारु, राजेंद्र बोरुडे, सोनू चौधरी, किशोर कानडे, राहुल तनपुरे आदी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर म्हणाले की, अन्यायाच्या विरोधात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजेत माझ्या बाबत घडलेल्या घटने संदर्भात प्रशासन ठामपणे उभे राहिले आहे शासकीय नोकरी करीत असताना आपण समाजासाठी काम करत असतो निमबाह्य काम करणार नाही तसेच वाद न घालता चर्चेद्वारे प्रश्न सुटणे गरजेचे आहे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे त्रास देऊन व शिव्या देऊन काम होत नसते उलट अधिकारी मनस्ताप करत असतात नोकरी करण्याची इच्छा राहत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे
यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे व अन्य १ नागरिक हे प्र. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे दालनात कामकाज चालू असताना कार्यालयात येवून अर्वाच्य भाषेत आरडा ओरड करून धमकी देवून प्र. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना शिवीगाळ केलेली आहे. या प्रकरणी प्र. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल केलेली आहे. तरी वारंवार महापालिकेच्या कार्यालयामध्ये नागरिक व पदाधिकारी येवून कामगार कर्मचारी व अधिकारी यांना धमकी देणे व शिवीगाळ करणेचे प्रकार चालू असतात याबाबत महापालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेवून संबाधितावर कठोर कारवाई करावी जेणे करून असे प्रकार वारंवार घडणार नाही. काल झालेल्या प्रकाराबाबत आज रोजी महापालिकेच्या मुख्य निदर्शने करून आपणास याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles