एम.आय.डी.सी. परिसरात व अहिल्यानगर शहरात दहशत निर्माण कराणारा सराईत गुन्हेगार
एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द मा. जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांचे आदेश…
प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, एम.आय.डी.सी. नागापुर परिसरात राहणारा संतोष रघुनाथ धोत्रे, वय 27 वर्षे, रा. दावल मलीक चौक, नागापुर, ता. जि.अहिल्यानगर याने एम.आय.डी.सी. व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात त्याचे साथीदारांसह दरोडा, जबरी चोरी करणे, जबरी चोरीचा प्रयत्न करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन अग्नीशस्त्रासह व घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करुन तेथील राहणारे सर्व सामान्य लोकांवर दहशत निर्माण केलेली होती. त्यामुळे एम.आय.डी.सी. व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच आजुबाजुच्या परिसरात सार्वजनीक सुव्यवस्थेस बाधीत झाली होती. सराईत गुन्हेगार संतोष रघुनाथ धोत्रे, याचे समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलीत कायदयान्वये करण्यांत आलेल्या प्रतिबंधक व हद्दपारीच्या कारवाया अपुऱ्या व कुचकामी ठरत होत्या. त्याचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी सहा.पोलीस निरीक्षक, श्री. माणिक चौधरी, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये प्रस्ताव तयार करुन श्री. अमोल भारती, उप विभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे व श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्फत मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांना सादर केला.
सदर प्रस्तावाची मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी बारकाईने पडताळणी करुन सदरचा प्रस्ताव हा शिफारस अहवालासह मा.जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांना सादर केला होता.
नमुद प्रस्तावांची व सोबतच्या कागदपत्रांची मा. डॉ.श्री.पंकज आशिया, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांनी पडताळणी करुन अहिल्यानगर जिल्हयातील सार्वजनीक सुव्यवस्था अबादित राहावी याकरीता सराईत गुन्हेगार संतोष रघुनाथ धोत्रे, वय 27 वर्षे, रा. दावल मलीक चौक, नागापुर, ता. जि.अहिल्यानगर स्थानबध्द करणे बाबतचे आदेश काढले असुन त्यास ताब्यात घेवुन नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द केले आहे.
सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर, स.फौ. रविंद्र पांडे, पोहेकॉ सुरेश माळी, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, माणिक चौधरी, पोकॉ सुरज देशमुख यांनी केली आहे.
अहिल्यानगर जिल्हयातील सराईत गुन्हेगार, वाळु तस्कर तसेच संघटीतपणे गुन्हे करणा-या टोळीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत असुन त्यांचेवर प्रचलित कायदयान्वये कठोर कारवाई करण्याचे संकेत मा.डॉ.श्री. पंकज आशिया, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर व मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिलेले आहेत.


