Tuesday, March 17, 2026

IT पार्क राज्याच्या बाहेर चाललंय, आपलं वाटोळं झालंय; पहाटे अजित दादा हिंजवडी दौऱ्यावर, सरपंचांनाही सुनावलं

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळीच हिंजवडीतील विविध विकासकामांची आणि मेट्रो प्रकल्पांची पाहणी केली. विशेषतः मेट्रो लाईन ३, वाहतूक कोंडी, नागरिकांच्या रस्ते समस्यांसंदर्भात त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. कामाची पाहणी करत असतनाच त्यांनी हिंजवडीतील सरपंच गणेश जांभुळकर यांना देखील सुनावलं.

अजित पवार आज पहाटेच हिंजवडीत पाहणी दौरा करण्यासाठी दाखल झाले आहेत. मेट्रो लाइन ३ यासह बाकी मेट्रोच्या कामाची पाहणी यावेळी त्यांनी केली. पाहणी दौरा दरम्यान, त्यांनी मेट्रो प्रशासन आणि प्रशासनाला सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. आता सुधारणा झाल्या आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय.

पाहणी दौरादरम्यान, त्यांनी अधिकाऱ्यांची शाळा घेतली. ‘आपलं असं ठरलंय. कामाच्यामध्ये कुणी आला तर, त्यावर ३५३ दाखल करा. मग तो कुणीही असो, अजित पवार देखील कामाच्या मध्ये आला तर, ३५३ दाखल करा. ३५३ लावायचं कारण, त्याशिवाय काम होणार नाही. आपल्याला लवकरात लवकर काम पूर्ण करायचं आहे’, असं अजित पवार म्हणाले.

कामाची पाहणी करत असतानाच हिंजवडीतील सरपंच गणेश जांभुळकर यांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले. ‘असू द्या साहेब. धरण करताना मंदिरात जातात ना.., तुम्हाला जे काही सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो. पण मला जे करायचं आहे तेच करतो. खरंतर आपलं वाटोळं झालंय. हिंजवडीतील आयटी पार्क पुणे, राज्याच्या बाहेर चाललं आहे. तुम्हाला काही पडलेली नाही. मी ६ वाजता कशासाठी पाहणी करण्यासाठी येतो. मला कळत नाही का, की माझी माणसं नाहीत..’ असं म्हणत अजित पवारांनी त्यांना खडसावलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles