काँग्रेसला मोठा धक्का! सहकारी बँकेच्या निवडणुकीत दिग्गज नेत्याच्या पॅनलचा दारुण पराभव, महायुतीचा विजय

भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भंडारा जिल्हा बँक निवडणूकांमध्ये नाना पटोले यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीला जिल्ह्यामध्ये मोठे यश मिळाले असून महाविकास आघाडीला पराभव पत्कारावा लागला आहे.

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. भंडारा गोंदिया सहकार क्षेत्रात महायुतीला मोठे यश मिळाले हे. महायुतीने बँक निवडणुकीत पंधरा जागांपैकी अकरा जागा जिंकल्या आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेसला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांच्या पॅनलच्या पराभवानंतर भाजपचे नेते परिणय फुके यांनी नाना पटोले आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘सहकार क्षेत्रात महायुतीला मोठे यश मिळाले असून महाविकास आघाडीचे पानिपत झाले आहे. सहकार क्षेत्रामध्ये भाजप पहिल्यांदाच इतक्या ताकदीने उतरले आहे’, असे वक्तव्य परिणय फुके यांनी केले आहे.

‘महाराष्ट्रात आणि विदर्भात काँग्रेसच्या नेत्यांची जशी वागणूक आहे, त्या वागणूकीमुळे जनता काँग्रेसला त्रस्त झाली आहे. लोकांना दिशाभूल करण्याचे काम काँग्रेस करत आहे. यामुळे नाना पटोले आणि काँग्रेसचा जनाधार कमी होत आहे. भाजपची ताकद वाढली आहे, स्ट्राईक रेट वाढत आहे. महायुतीत असलेले नरेंद्र भोंडेकर हे दुग्ध संघाच्या निवडणुकीत नाना पटोले यांच्यासोबत गेले होते. मात्र चूक लक्षात आल्यानंतर बँक निवडणुकीत ते भाजपसोबत आहेत’, असे परिणय फुके यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles