नियमबाह्य निविदा प्रक्रिया ,जिल्हा शल्यचिकित्सकासह तीन वरिष्ठ आरोग्य अधिकारी निलंबित

अकोला : अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु विभागात भरती प्रक्रिया राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र हि संपूर्ण प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याला जबाबदार धरत जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेसंदर्भात पावसाळी अधिवेशनात वाशिमचे भाजप आमदार श्याम खोडे यांनी विधानसभेत निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला होता. यात आपल्या मर्जीतील लोकांना कंत्राट मिळण्यासाठी या तिघांनीही निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले होते. ७२ निविदेतल्या फक्त चार निविदा अंतिम ठरवत त्यातील दोघांच्याच निविदा अधिकृत केल्या होत्या.अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी सन २०२४-२५ मध्ये ३१ जागा भरण्यासाठी ई निविदा प्रक्रियेतील घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया नियमबाह्य आणि अतांत्रिक पद्धतीने करण्यात आल्यावरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्यासह दोन उच्च पदस्थ अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जयंत पाटील आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी ए.एन. डांबरे यांचा यात समावेश आहे.

या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटलेत. वाशिमचे भाजप आमदार श्याम खोडे यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करत “आपल्या मर्जीतील लोकांना ठेका देण्यासाठी प्रक्रिया हाताळली गेली” असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर शासनस्तरावरून तातडीने चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles