Thursday, February 19, 2026

नगर शहरात गोल्ड लोनच्या नावाखाली सेवानिवृत्त व्यक्तीची फसवणूक, कर्मचार्‍याने केले 12 तोळे सोने लंपास

नगर शहरात गोल्ड लोनच्या नावाखाली सेवानिवृत्त व्यक्तीची फसवणूक, कर्मचार्‍याने केले 12 तोळे सोने लंपास
अहिल्यानगर-श्रीरामनगर, पाईपलाईन रोड येथील रहिवासी आणि कॅनरा बँकेचे निवृत्त असिस्टंट मॅनेजर किशोर हिरामण बावीसकर (वय 66) यांनी ए. यु. स्मॉल फायनान्स बँकेच्या एकविरा चौक शाखेतील कर्मचारी देवेश दिपककुमार वर्मा याच्याविरुद्ध 12 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा आरोप करत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.बावीसकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 2023 मध्ये पैशाच्या गरजेसाठी त्यांनी ए. यु. स्मॉल फायनान्स बँकेत 15 तोळे सोन्यावर गोल्ड लोन घेतले होते. यापैकी 12 तोळे सोने चार लोन खात्यांमधून परत घेतले, तर 3 तोळे बँकेत शिल्लक होते. मात्र त्यांना पुन्हा पैशाची गरज असल्याने त्यांनी ए. यु. स्मॉल फायनान्सचे कर्मचारी देवेश कुमार वर्मा यांना संपर्क केला. 27 मार्च 2025 रोजी सायंकाळी वर्मा याने फोनवर बावीसकर यांना शिलाविहार रोडवरील सुनिल वडापाव येथे सोने देण्यास सांगितले. देवेशने आपल्या माणसाला पाठवल्याचे सांगितल्याने बावीसकर यांनी अनोळखी व्यक्तीकडे 12 तोळे सोने दिले. देवेशने फोनवर ती व्यक्ती बँकेचा कर्मचारी असल्याचे खात्री दिली.

मात्र, एक आठवडा उलटूनही लोन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बावीसकर यांनी देवेशशी संपर्क साधला. देवेशने सोने घेतल्याचे नाकारत उडवाउडवीची उत्तरे दिली. यापूर्वी बावीसकर यांनी तोफखाना पोलिसांत तक्रार दाखल केली होती, पण देवेशने पोलिसांनाही सोने घेतले नसल्याचे सांगितले. यामुळे बावीसकर यांनी वर्मा याच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद नोंदवली. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles