Wednesday, October 29, 2025

सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील विकास कामे ; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

राजकारणापेक्षा विकास कामांना जास्त महत्त्व देतो :- सुजित झावरे पाटील

पारनेर :- वडझिरे (ता. पारनेर) येथे स्व.दत्तात्रय मारुती सुरुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते पार पडले. स्व.माजी आमदार वसंतराव झावरे पाटील यांचे खंदे सहकारी असलेल्या स्व.दत्तात्रय सुरुडे यांच्या स्मरणार्थ हे कार्य हाती घेतले असून, यामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

भूमिपूजन प्रसंगी बोलताना सुजित झावरे पाटील यांनी थेट शब्दांत स्पष्ट केले की, “मला राजकारणात कुणाशीही स्पर्धा करायची नाही. माझी स्पर्धा ही केवळ विकासाशी आहे. पारनेर तालुक्याच्या विकासासाठी व जनतेच्या प्रश्नांवर उपाय शोधत गावागावात ठोस काम करणे हेच माझे ध्येय आहे. लोकांचे मन जिंकायचे असेल तर आश्वासनं देऊन न थांबता प्रत्यक्ष काम करून दाखवावे लागते आणि आम्ही तेच करत आहोत.“ याचबरोबर सुजित झावरे पाटील पुढे म्हणाले की, “स्व.दत्तात्रय सुरुडे यांनी कायम स्व.मा.आ.वसंतराव झावरे पाटील यांना सोबत देत वडझिरे गावाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या निष्ठा व कार्यातून प्रेरणा घेत मी त्यांच्या स्मरणार्थ हे विकासकाम समर्पित करीत आहे.

सुजित झावरे पाटील यांनी दिलेले आश्वासन केवळ शब्दांपुरते न ठेवता, आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अप्रत्यक्ष संदेश दिला. केवळ टीका-टिप्पणी करणाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष विकासाच्या आघाडीवर उभे राहणारे नेतृत्वच खऱ्या अर्थाने लोकांचा विश्वास संपादन करू शकते, असा स्पष्ट संदेश या भूमिपूजनातून दिसून आला.कार्यक्रमाला अरुणराव ठाणगे, बाळासाहेब रेपाळे, सतीश पिंपरकर, सरपंच ऋषी दिघे, सोपान करंडे, शिवाजी औटी, राजाराम एरंडे, बाळासाहेब दिघे, मोहन चौधरी, विवेक मोरे, सुभाष सुरुडे, डॉ. श्रीमंत दिलपकर, अनिकेत एरंडे, डॉ. गणेश चौधरी, सचिन करकंडे, संतोष दिघे, पोपटराव शेटे, बाबाजी करकंडे, सोमनाथ दिघे, दिगंबर भालेराव, शुभम निघूट, निलेश बोरकर, संभाजी मोरे, संतोष रोकडे यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles