Thursday, October 30, 2025

महाराष्ट्र हादरला! तिघांसोबत संबंध ठेव, नराधमांची बळजबरी, मुलीने उचललं टोकाचं पाऊल

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून तसेच इन्स्टाग्रामवर फोटो ठेवून बदनामी झाल्यामुळे विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये शिकणारा गणेश भांगरे (20 रा. रामटेकडी झोपडपट्टी तपोवन) अक्षय मदन वरठे (21 रामटेकडी झोपडपट्टी तपोवन) अतिष राजकुमार वैद्य (पूर्ण पत्ता माहित नाही) यांनी मयत मुलीच्या गळ्यात हात घालून काढलेला फोटो इंन्स्टावर ठेवल्याने समाजामध्ये बदनामी झाली.ही बदनामी सहन न झाल्याने तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघे संशयित कॉलेजमध्ये वेळोवेळी येऊन तिला आरोपी सोबत जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडत होते. या प्रकारामुळे मुलीवर मानसिक ताण निर्माण झाला होता. आरोपींनी फिर्यादीच्या मुलीचे इन्स्टाग्राम युजर आयडी व पासवर्ड वापरून तिचे सोशल मीडिया खाते उघडले. त्यानंतर, तिचा व आरोपी अक्षय वरठे याचा गळ्यात हात घालून काढलेला फोटो त्या इन्स्टाग्राम खात्यातून अक्षय वरठे याच्या इन्स्टाग्रामवर पाठवून तो तिचा बॉयफ्रेंड आहे, असा मजकूरसुद्धा लिहून फोटो पोस्ट केला. त्यामुळे मुलीची समाजात आणि कॉलेजमध्ये बदनामी झाली.

त्यानंतर गणेश भांगरे नामक व्यक्तीने मुलीला फोन करून अश्लील आणि अपमानास्पद भाषेत शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे, तिच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पसरवून तिचा मानसिक छळ केला. या सर्व प्रकारांच्या एकत्रित परिणामामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी आरोप केला आहे. या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादीने केली आहे. दरम्यान या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles