Friday, February 20, 2026

नगर शहरातील ५२ गाळेधारकांना महानगरपालिकेच्या जप्तीच्या नोटीसा

जुना दाणे डबरातील ५२ गाळेधारकांना महानगरपालिकेच्या जप्तीच्या नोटीसा

गाळेधारकांनी थकवले २.०७ कोटी रुपये, वसुलीसाठी कारवाई सुरू

तत्काळ थकबाकी जमा करा अन्यथा गाळे जप्त करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – शहरातील महानगरपालिकेच्या गंज बाजार, सर्जेपूरातील रंगभवन, सिध्दीबाग, प्रोफेसर चौक, सावित्रीबाई फुले फेज १ व फेज २, भाग्योदय – बालाजी कॉलनी व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावल्यानंतर आता मध्य शहरातील बाजारपेठेत असलेल्या जुना दाणे डबरातील ५२ गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे. गाळेधारकांकडे २.०७ कोटींची थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी सर्वांना जप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे जप्त करून ताब्यात घेतले जातील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

महानगरपालिकेच्या गाळेधारकांकडे सुमारे २५ कोटींची थकबाकी आहे. मार्च महिन्यात महानगरपालिकेने थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर शहरातील सर्व गाळे, खुल्या जागा, वर्ग खोल्या आदींचा सर्वे मार्केट विभागाकडून करण्यात आला. थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने सर्वच गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे. सर्व थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. दाणे डबरातील गाळेधारकांकडे २.०७ कोटींची थकबाकी आहे. तसेच, बहुतांश करारनामेही संपुष्टात आलेले आहेत. थकबाकीदार गाळेधारकांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी थकीत भाडे न भरल्यामुळे या थकबाकीदारांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ८१(ब) नुसार जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

मागील आठवड्यात दिवसांपूर्वी रंगभवन व्यापारी संकुलातील गाळेधारकांवर कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यांनी ४८.९६ लाख रुपये जमा केल्याने त्यांची कारवाई टळली. भाग्योदय व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनीही काही रक्कम जमा केल्याने तूर्तास कारवाई टळली आहे. थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिका कठोर कारवाई सुरू करणार आहे. त्यामुळे गाळेधारकांनी थकबाकी भरून कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles