सभापती प्रा.राम शिंदे मित्र मंडळाच्या वतीने श्री विशाल गणेश मंदिरात तिरुपती येथील लाडूचा प्रसाद वाटप
अहिल्यानगर – विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे मित्र मंडळाच्या वतीने श्री विशाल गणेश मंदिर येथे तिरुपती बालाजीच्या पवित्र लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिरात महाआरती करून भाविकांना हा प्रसाद देण्यात आला. हा प्रसाद विशेष प्रयत्न करून तिरुपती येथून प्रा. राम शिंदे यांनी उपलब्ध करून दिला होता.
यावेळी यावेळी प्रा. राम शिंदे मित्र मंडळाच्या वतीने कार्यालय प्रमुख सोमनाथ बाचकर, दत्तात्रय कोपनर, समीर कुलकर्णी, देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर व निशांत दातीर यांच्या हस्ते महाआरती पार पडली. यावेळी चंद्रकांत फुलारी, नितीन पुंड उपस्थित होते. महाआरतीनंतर भाविकांना तिरुपती लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिराचा परिसर भक्तांच्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषाने दुमदुमून गेला.े
कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर म्हणाले, प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. भाविकांना तिरुपती प्रसादाचा लाभ मिळावा ही त्यांची भावना होती आणि ती आज प्रत्यक्षात साकार झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे भाविकांना आध्यात्मिक समाधान लाभते. प्रा. शिंदे यांचे कार्य हे सदैव लोकाभिमुख राहिले आहे आणि त्यातून समाजात श्रद्धा, विश्वास आणि एकोपा वाढीस लागतो.
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे कार्यालयाचे प्रमुख सोमनाथ बाचकर म्हणाले, गणेशोत्सव हा एकात्मतेचा आणि भक्तिभावाचा उत्सव आहे. जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये या तिरुपती लाडू प्रसादाचे वाटप करण्यात येणार असून आज पहिल्या दिवशी अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे या महाप्रसाद उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये हा प्रसाद भाविकांना मिळणार आहे. हा उपक्रम म्हणजे भक्ती आणि समाजकार्याचा संगम असून सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रेरणेतून आम्ही हा प्रसाद वितरण उपक्रम सातत्याने राबवणार आहोत. भगवान गणेशाच्या कृपेने प्रत्येक घरात सुख, शांती आणि समाधान नांदो हीच आमची प्रार्थना आहे.
यावेळी शहरातील भाजपच्या चारही मंडलाध्यक्ष, दक्षिण जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, कर्जत व जामखेड येथील पदाधिकार्यांना या प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


