कार्यकारी अभियंता यांना खासदार लंके यांचे पत्र.
नगर, टाकळी काजी, भातोडी, बीड रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम असून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी.
नगर (प्रतिनिधी)– अहिल्यानगर-टाकळी काझी-भातोडी-बीड या महामार्ग क्र. १६ (कि.मी. २०/४० ते २५/३४०) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम गेल्या 18 महिन्यांपासून रखडले असून 36 महिन्यांत पूर्ण होणारे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. या कामामुळे परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने खासदार निलेश लंके यांच्या पत्रावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत तांबोळी, चिचोंडी पाटील चे सरपंच शरद पवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, अल्पसंख्यांक अध्यक्ष पापामिया पटेल, केशव बेरड, गणेश तोडमल, चंदूकाका पवार आदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, विलंबामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून मोठमोठे खड्डे, अर्धवट डांबरीकरण व निकृष्ट दर्जाचे काम यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज अपघात व वाहतुकीला अडथळे वाढत असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात असुन कामाचे स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण समितीमार्फत परीक्षण करावे, ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामावर कारवाई करून आवश्यक त्या दंडात्मक उपाययोजना कराव्यात, प्रलंबित काम निश्चित वेळेत पूर्ण करावे व त्याबाबत दर १५ दिवसांनी अहवाल सादर करावा, सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतःहून देखरेख ठेवून तातडीने काम मार्गी लावून निकृष्ट व विलंबित कामाबाबत ठेकेदार जबाबदार असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
नगर तालुक्यात टाकळी काजी, भातोडी, बीड रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे कामाची चौकशी करण्यासाठी मागणी
- Advertisement -


