सर्वोच्च न्यायालयात टीईटी संदर्भात पूनर्विचार याचिका दाखल करणार -बसवराज गुर्रीकर
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा निर्णय
नवी दिल्ली-अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर (कर्नाटक),राष्ट्रीय सरचिटणीस कमलाकांत त्रिपाठी(ओडिशा)व राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद ठकरान(नवी दिल्ली)यांच्या समवेत कार्यकारिणी च्या सभेमध्ये पूनर्विचार याचिका दाखल करण्याचा हा ठराव पारित करण्यात आल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी दिली .
सर्वोच्च न्यायालयाने देशातील शिक्षकांना नोकरी व पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य केली असल्याने या संदर्भात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद ठकरान यांनी नवी दिल्ली येथे विविध कायदेतज्ज्ञ यांच्या भेटी घेवून, कायदेशीर सल्ला घेतला असून याबाबत लवकरच पूनर्विचार याचिका संघटनेमार्फत दाखल होणार आहे.
१९/२० सप्टेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा.पंतप्रधान यांना निवेदन संघटनेमार्फत देण्यात येणार असून, येत्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक राज्यातील विविध पक्षांच्या खासदारांना संबंधित राज्याचे राज्याध्यक्ष यांचे मार्फत टीईटी परीक्षा अनिवार्य केले बाबत येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणे व कायद्यात सुधारणा करणे कामी लवकरच निवेदन देण्यात येणार आहेत .
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे,राष्ट्रीय संयुक्तसचिव विनयश्री पेडणेकर,राज्य कार्याध्यक्ष अण्णा आडे,राज्य सल्लागार प्रकाश दळवी, सुरेश भावसार, विश्वनाथ सूर्यवंशी, वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन टीईटी परीक्षा अनिवार्य करणे संदर्भात केंद्र शासनाला विनंती करण्याची मागणी करण्यात येणार आहे .


