लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
केवायसीसंदर्भात नवीन नियम लागू
आता वडील किंवा नवऱ्याची केवायसी अनिवार्य
लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे गरजेचे आहे. दरम्यान, केवायसी न केल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. याचसोबत केवायसीमध्ये जर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे. दरम्यान, आता या योजनेच्या केवायसीसंदर्भात अजून एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. आता या योजनेत लाभार्थी महिलांसोबतच त्यांच्या वडील किंवा पतीची केवायसीदेखील करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अजून घटण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसीमधून अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता महिलांच्या पती किंवा वडिलांचीही केवायसी केली जाणार आहे. त्यामुळे महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न किती आहे याचीही पडताळणी केली जाणार आहे.लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. तुम्हाला तोपर्यंत केवायसी करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाहीये. लाभार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे.


