Thursday, October 30, 2025

आरोग्य विभागाच्या एनएचएम कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के मानधन वाढ!

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी भरघोस मानधन वाढ देण्यात येणार आहे. त्याबाबत शासन मान्यता देण्यात आली असून, राज्यभरातील पन्नास हजारावर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून आरोग्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांचा आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दहा वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळची बाब म्हणून सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे.

कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार,अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, सन २०१६-१७ पूर्वी सेवेत आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे यासह इतर मागण्याच्या बाबत शासन सकारात्मक असून पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची गेले अनेक वर्षापासून भरीव मानधन वाढीची मागणी होती. तेसच त्यासाठी राज्याव्यापी कामबंद आंदोलनही केले होते. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. पंधरा टक्के पैकी पाच टक्के मानधन वाढ सरसकट लागू होणार असून उर्वरित मानधन वाढ ही कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यांकन (परफॉर्मन्स रिपोर्ट) नुसार करण्यात येणार आहे.

एनएचएम कर्मचाऱ्यांचा आरोग्य यंत्रणा बळकटी करणात महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दहा वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन, एनएचएम कर्मचाऱ्यांना अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे. कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार,अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्याच्या बाबत शासन सकारात्मक असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles