गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा

दिवाळीच्या अगदी तोंडावर गुजरात मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सोडून सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. सर्व मंत्र्यांनी मुख्यंत्र्यांकडे राजीनामे सोपवले आहेत. भूपेंद्र पटेलांच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी राजीनामे सोपवले. राजीनाम्यापूर्वी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर राजीनामे स्वीकारले गेले. दरम्यान, आता सर्व राजीनामे राज्यपालांकडे सोपवले जातील. महत्त्वाचं म्हणजे सर्व मंत्र्यांचे राजीनामे खिशात होते, या राजीनामापत्रांवर सह्याही होत्या. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर सर्व मंत्र्‍यांनी खिशातून राजीनामे बाहेर काढले. नवीन मंत्र्यांचा शपथविधी उद्याच 17 ऑक्टोबर रोजी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत होईल. सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 17 मंत्र्यांचा समावेश आहे. यापैकी आठ कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत आणि तेवढेच राज्यमंत्री (एमओएस) आहेत. भाजपच्या सर्व आमदारांना दोन दिवस गांधीनगरमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची अपेक्षा असलेल्या आमदारांना फोनवरून माहिती देण्यात आली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्रीच 9 वाजता गुजरातमध्ये पोहोचतील. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा शुक्रवारी सकाळी गुजरातमध्ये पोहोचत आहेत. राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सलही आज गुजरातला भेट देणार आहेत. मंत्र्यांचे राजीनामे राज्यपाल देवव्रत आचार्य यांना सादर केले जातील. राजीनाम्यांसोबतच नवीन मंत्र्यांची यादी राज्यपालांना सादर केली जाईल. नवीन चेहऱ्यांमध्ये, काँग्रेसमधून सामील झालेले अर्जुन मोढवाडिया, अल्पेश ठाकोर, सीजे चावडा आणि हार्दिक पटेल यांना संधी मिळू शकते. सौराष्ट्रातील जयेश राडाडिया आणि जितू वाघानी यांना मंत्रिपद मिळणे निश्चित आहे. उत्तर गुजरातमधील पाटीदार आणि ठाकोर समुदायांवर विशेष लक्ष दिले जाईल. भूपेंद्र पटेल यांची 2022 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून, तीन वर्षांसाठी कोणतेही मंत्रिमंडळ बदल झाले नाहीत. 2027 मध्ये निवडणुका होणार आहेत. याला निवडणुकीची तयारी म्हणून पाहिले जात आहे. राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सध्याच्या सरकारमधील बहुतेक मंत्री भाजप हायकमांडच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. शिवाय, अलिकडेच झालेल्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि बहुतेक इतर नेते आपच्या गोपाल इटालिया यांना पराभूत करण्यासाठी विसावदरला गेले होते. तरीही, विसावदरची जागा जिंकली गेली नाही. हे मंत्रिमंडळ विस्तारातही दिसून येईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles