Gold- Price: सोन्याच्या दरात मोठा फेरबदल;जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत

सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी, शनिवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,६४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १११,५०३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १४८,८४० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,४५४ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १११,३०२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १२१,४२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १११,३०२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,४२० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १११,३०२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,४२० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १११,३०२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,४२० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles