Saturday, February 21, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक, जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर म्हणाले….भाजपला जनतेचा रोष सहन करावा लागेल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची आढावा बैठक संपन्न.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देऊन भाजपला जनतेचा रोष सहन करावा लागेल- जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याची आढावा बैठक पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान बाबासाहेब भोस यांना देण्यात आले, तर बैठकीचे प्रस्ताविक भाषण उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी केले.
बैठकीस जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, प्रतापकाका ढाकणे, अरुण पाटील कडू, रावसाहेब म्हस्के, जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, नगर तालुकाध्यक्ष शरद पवार, पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगाव तालुकाध्यक्ष हरिष भारदे, नगर तालुकाध्यक्ष शरद पवार, युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे, महिला जिल्हाध्यक्षा योगिता राजळे, युवती जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अथर खान, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे, किसनराव लोटके, विजय मोढळे, सुरेश भोसले, रघुआबा काळदाते, प्रकाश पोटे, नलिनी गायकवाड, सुवर्णा धाडगे, सुधीर म्हस्के, केशव बेरड, संजय वराट, फारुक रंगरेज, यांचेसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत प्रत्येक तालुक्याचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. सर्व तालुकाध्यक्षांनी येणाऱ्या निवडणुकांबाबत तयारीचा अहवाल सादर केला. कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीच्या बळावर निवडणुका लढवून राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व स्तरावर यश मिळवून देण्याचा निर्धार दिसून आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेबांची विचारधारा म्हणजे संघर्ष प्रामाणिकपणा आणि विकास प्रत्येक कार्यकर्त्यांनी मीच राष्ट्रवादी ही भावना मनात ठेवून काम केले पाहिजे पक्षाचे बळ हे फक्त मोठ्या नेत्यांमुळे नसते ते तळागाळातील कार्यकर्त्यांमुळे उभे राहते, आज समाजात असंतोष आहे बेरोजगारी वाढली आहे शेतकरी संकटात आहे अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच एकमेव पर्याय ठरते आपण एकजुटीने आणि नियोजनबद्धपणे काम केल्यास जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा प्रत्येक गावात फडकणार असल्याची भावना व्यक्त केली तर प्रताप काका ढाकणे म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्रात विकासाची नवी दिशा दिली त्या विचारांना पुढे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी सजग राहावे आता पक्ष फक्त राजकारणापुरता नको तर सामाजिक कार्य शेतकरी महिला युवकांनी शिक्षण क्षेत्रात सक्रिय राहिला पाहिजे, भाजपचे खोटे आश्वासन आता जनतेला पटेनासे झाले आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता राष्ट्रवादी काँग्रेस कडे पाहत आहे हीच वेळ आहे पक्ष मजबूत करण्याची, गावोगाव फिरा शेतकऱ्यांच्या अडचणी ऐका सामान्य जनतेशी थेट संवाद साधा पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी फक्त प्रचार नव्हे तर प्रत्यक्ष काम हवे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी आपल्या भाषणात पक्षाची भूमिका स्पष्ट करत भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजप सरकारने शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक केली आहे. अतिवृष्टी, बाजारभावाचा अभाव आणि शेतमालाची घसरण यामुळे शेतकरी उभा राहू शकत नाही. सरकारला शेतकऱ्यांचा फायदा नाही, फक्त मोजक्या उद्योगपतींची काळजी आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी रस्त्यावर उतरून लढेल.व राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्या संकटकाळात झाली, त्यावेळी कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले. आजही त्याच एकतेची आणि जिद्दीची गरज आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावात, विभागात ताकदीने काम करावे. बूथस्तरावर पक्षाची पकड मजबूत करा. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने मत चोरी आणि बाहेरील मते आणून सत्ता काबीज केली. यावेळी आपण सजग राहून प्रत्येक मत सुरक्षित ठेवणे हीच खरी लढाई आहे. उमेदवार असो वा कार्यकर्ता प्रत्येकाने जबाबदारीने काम केल्यास जिल्हा परिषदेपासून, पंचायत समिती व महापालिकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे फडकतील. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विजय निश्चित होणार असल्याची भावना व्यक्त केली तर बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जिल्ह्यातील सर्व निवडणुका एकजुटीने लढवण्याचा संकल्प केला.
यावेळी महिला, युवक, युवती, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय विभागांचे प्रतिनिधी यांनी देखील संघटनवाढ, आणि मतदारसंघातील जनसंपर्क मोहीम वाढवण्याचे नियोजन सादर केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles