नगरसेवक योगीराज गाडे यांच्यामार्फत गुलमोहर रोडला मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न
नगर- गुलमोहर रोडवरील आनंद विद्यालय येथे आज मोफत सर्व रोग निदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.नगरसेवक योगीराज गाडे यांच्या पुढाकाराने, साईमाऊली हॉस्पिटल आणि अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सकाळी १० वाजताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसू लागली आणि नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी, गुडघेदुखी–सांधेदुखी तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य निदानासाठी शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी “वॉर्ड ३ मध्ये असा उपक्रम नेहमी हवा” अशी भावना व्यक्त केली.
संपूर्ण व्यवस्थापन सुरळीत आणि लोकाभिमुख झाल्यामुळे योगीराज गाडे यांच्या या उपक्रमाबद्दल वॉर्डमधील चर्चेला उधाण आले असून, अशाच आरोग्य सेवा पुढेही सुरू राहणार आहेत असे योगीराज गाडे यांनी सांगितले


