Saturday, February 21, 2026

संगमनेरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला

संगमनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यंदा ‘नातेवाईक विरुद्ध नातेवाईक’ अशी अभूतपूर्व लढत रंगणार असून दोन वेगवेगळ्या राजकीय गटांच्या प्रतिष्ठेलाच थेट धक्का बसणार आहे. विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे एका बाजूला, तर महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ दुसऱ्या बाजूला रिंगणात उतरत असल्याने या दोन्ही आमदारांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.यात आणखी भर घालत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये तांबे–थोरात घराण्याचे राजकीय वर्चस्व, तांबे–खताळ संघर्ष आणि नातेवाईकीतील स्पर्धा अशा तिहेरी संघर्षाचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचा दशकानुदशकांचा प्रभाव असलेल्या संगमनेरमध्ये यंदा काँग्रेसने अधिकृत उमेदवार न देण्याचा घेतलेला निर्णय हा आणखी एक महत्त्वाचा कलाटणीबिंदू ठरू शकतो. मात्र मंगळवारी (25 तारखेला) अर्ज मागे घेतल्यानंतरच खरे समीकरण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडी ही संगमनेर सेवा समिती नावाने आघाडी करून निवडणूक रिंगणात असल्याने बाळासाहेब थोरात यांच्याच मतदारसंघात महाविकास आघाडी पक्षाचे चिन्ह घेण्याऐवजी नवीन चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles