Saturday, March 7, 2026

नेवासामध्ये एकाच वेळी आठ दुकाने जळून खाक, मोबाईल शॉपसह बॅग हाऊस कोल्ड्रिंक्स शॉपचं मोठं नुकसान

नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात मेन रोडवरील आठ दुकाने जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने शहरात खळबळ उडाली आहे. सलून, मोबाईल शॉप, बॅग हाऊस, प्रसाधनालय, कोल्ड्रिंक्स शॉप, गॅस शेगडी रिपेरिंग, केक शॉप व किड्स वेअर दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, याप्रकरणाचा तपास सुरु आहे


परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात मदत कार्यासाठी धावून
. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात मदतकार्यासाठी धावून आले आहेत. नेवासा नगरपंचायत व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस प्रशासनातर्फे गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, अचानक आग लागल्यामुळं परसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, ही आग नेमकी कशामुळं लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, या आगीत एकूण आठ दुकाने जळून खाक झाली आहेत. यामुळं व्यवसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच घटनास्थळी अग्नीशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, आग मोठ्या प्रमाणात लागली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles