अहिल्यानगरमधील राहाता पालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. ठाकरे सेनेतून निलंबित राजेंद्र पठारे यांनी ऐनवेळी नगराध्यक्ष पदाचे दोन्ही अर्ज मागे घेतले आहेत. पठारे यांनी पक्षाच्या AB फॉर्मसह अपक्षही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल केली होती. पाठरे यांनी AB फॉर्म चोरल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केला होता. त्यावर बोलताना पठारे म्हणाले यावर तीन तारखेनंतर उत्तर देईन. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्यासह सागर लुटे आणि उज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी करणअयात आलीय. अर्ज भरल्यानंतर आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचं पठारे म्हणालेत. हकालपट्टींनंतर अश्रू अनावर पदाधिकाऱ्यांना झाले होते. ठाकरे सेना स्थानिक आघाडीत सहभागी असताना पठारे यांनी ठाकरे सेनेकडून उमेदवारी दाखल केली होती. पठारे यांच्या उमेदवारीनंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या त्यानंतर पठारे यांनी नराध्यक्षपदाचे अर्ज मागे घेतले. तर नगरसेवक पदाचे अर्ज कायम ठेवलेत. दरम्यान पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतरीही राजेंद्र पठारे, सागर लुटे आणि उज्वला होले यांची पक्षचिन्हावर उमेदवारी अर्ज कायम आहेत.
उमेदवार राजेंद्र पठारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि अपक्ष म्हणून नगरध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते, ते मागे घेतले आहेत. प्रभाग ५ मधून नगरध्यक्षपदाठी अर्ज केला होता. ही उमेदवारी मागे घेतलेली नाही. त्यानंतर सागर लुटे हे प्रभाग ७ मधून निवडणुकीत उभे आहेत. उज्वला होले यांची उमेदवारी देखील प्रभाग ८मधून आहे, तेही मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
तर अर्ज चोरीचे आरोप तथ्यहीन आहेत, आरोप करणाऱ्यांना आपण तीन तारखेनंतर उत्तर देणार असल्याचं पठारे म्हणालेत. अपक्ष चिन्हामुळे वाद सुरू झालाय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हाकलपट्टीची कारवाई झालीय. तर अपक्ष म्हणून दाखल करण्यात आलेली उमेदवारी ही काही कारणामुळे मागे घेण्यात आलीय.


