राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर पडणार? अजित पवारांचे संकेत, म्हणाले….

स्थानिक स्वराज्य निवडणुकींची पाच वर्षांहून अधिक काळानंतर मोठी उत्सुकता आहे. नगरपालिका, नगरपरिषद यासाठी सत्ताधारी, विरोधक सुद्धा एकत्र आल्याचे दिसते. त्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बार उडणार आहे. पण जिल्हा परिषद निवडणुकीवर टांगती तलवार आहे. या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याविषयीचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वकिलांनी ही माहिती दिल्याचे अजित पवारांनी सांगितलं. कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जाऊ शकते, असं अजित पवार म्हणाले. नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणूक विविध कारणामुळे लांबणीवर पडली. जिल्हा परिषद निवडणूक कधी होणार यासाठी अनेक इच्छुक वेटिंगवर आहेत. मात्र पुन्हा एकदा निवडणूक लांबन्याची शक्यता वर्तवली जात असताना अजित पवारांनी यावर भाष्य करत हि माहिती दिलीय.

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles