Friday, February 20, 2026

मनपा निवडणूक, प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ, हरकती नोंदवा, कळमकर यांचे आवाहन

मनपा निवडणूक, प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ, हरकती नोंदवा, कळमकर यांचे आवाहन

अहिल्या नगर महापालिका प्रशासनाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी दि. २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली आहे. मात्र यादीत मोठ्या प्रमाणात चुका, नावे वगळणे, चुकीची नोंदणी आणि प्रभाग बदल आढळत असून प्रशासनाचा निष्काळजीपणा व मनमानी स्पष्ट दिसून येते. सत्ताधाऱ्यांनी सोयीप्रमाणे प्रभाग रचना करून नागरिकांची दिशाभूल केल्याचा संशय अधिक बळकट झाला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली आहे.

कळमकर यांनी सांगितले की,
महानगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्व संभाव्य उमेदवारांना विनंती ही मतदार यादी काळजीपूर्वक तपासा. आज हरकत घेतली नाही, तर उद्या स्वतःच्या प्रभागातच आपले हक्काचे मतदार नसण्याची शक्यता आहे.

हरकती व आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख: २७ नोव्हेंबर, २०२५

निवडणुकीची पारदर्शकता राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, चुका दुरुस्त न केल्यास आम्ही त्यांना जबाबदार धरणार आहोत.

आपले नाव चुकीने दुसऱ्या प्रभागात जोडले गेले असल्यास संपर्क साधा!
त्याचप्रमाणे मतदार यादीमध्ये आपले नाव शोधण्यासाठी खालील वेबसाइट अथवा मोबाईल अँप्लिकेशन चा वापर करा.
📞 ‪+91 70831 39383‬

https://electoralsearch.eci.gov.in/
Voter helpline application‌, असं आवाहन कळमकर यांनी केले आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles