अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एका लग्नसोहळ्यात हृदयद्रावक घटना घडली. विवाहविधी संपन्न झाल्यावर अवघ्या अर्ध्या तासातच नवरदेव अमोल गोड यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले. नववधूसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
थाटामाटात लग्न पार पडताच फक्त अर्ध्या तासातच नवरदेवाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. अमरावतीमधील वरुडमध्ये ही ह्रदयद्रावक घटना घडली. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं लग्न मांडवात शोककळा पसरली. मृत झालेल्या नवरदेवाचे नाव अमोल गोड असे आहे. नवरदेवाचा मृत्यू झाल्याने आनंदी उत्सव सुरू असलेल्या लग्नमांडवात काही क्षणातच शोककळा पसरली. अमोल गोड हे कोतवाल म्हणून कार्यरत होते. त्यांचं लग्नाच्या दिवशीच निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.अमरावतीत वरुड तालुक्यातील पुसलामध्ये लग्नसोहळ्यात हृदयद्रावक घटना घडली. लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अमोल गोड असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. लग्नानंतर नवरदेवाला चक्कर येताच मंडपात खळबळ उडाली. पाहुण्यांनी तातडीने नवरदेवाला रुग्णालयात पाठवले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. लग्नाचा आनंद क्षणात दुःखदायक शोकांतिका ठरला. वर आणि वधूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
अमरावतीमधील वरुड तालुक्यातील पुसला गावात अमोल गोड हे कोतवाल म्हणून कार्यरत होते. त्यांचं थाटमाटात लग्न पार पडले. वधू आणि वर पक्षामध्ये आनंदाचे वातावरण होते. पण ज्या ठिकाणी सनईचे सूर वाजत होते, त्याच ठिकाणी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने स्मशान शांतता पसरली. आयुष्याचा सर्वात आनंदी दिवस असतानाच नवरी विधवा झाली. नवरदेवाचा हॉर्ट अटॅकने मृत्यू मृत्यू झाला अन् कुटुंबावर शोककळा पसरली.


