अहिल्यानगर शहरात संविधान दिन उत्साहात साजरा; आ. संग्राम जगताप यांचा सत्कार

संविधान दिन उत्साहात साजरा. आ. संग्राम जगताप यांचा सत्कार, संविधान उपदेशकीच्या पठनाने परिसर दुमदुमले.
नगर (प्रतिनिधी)- समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उपदेशकेचे सामूहिक पठन करण्यात आले. यानंतर संविधान रक्षक आमदार संग्राम जगताप यांना संविधान उपदेशकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सुरेशभाऊ बनसोडे, प्रा. माणिक विधाते, परिमल निकम, अजय साळवे, संजय खामकर, रवींद्र कांबळे, रेशमाताई आठरे, लतीका पवार, विशाल कांबळे, संतोष पाडळे, विशाल भिंगारदिवे, कौशल गायकवाड, प्रकाश वाघमारे, सतीश शिरसाट, सुरेश वैरागर, समीर भिंगारदिवे, किरण गायकवाड, सुभाष वाघमारे, सुहास पाटोळे, विनोद कांबळे, संतोष नवसुपे, येसुदास वाघमारे, वैभव औटी, सौरभ कांबळे, दीपक सरोदे, सुजन भिंगारदिवे, गणेश कांबळे, शिवाजी भोसले, विजय कांबळे, गणेश केदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली. राजेशाहीचा अंत करून देशाची सूत्रे सर्वसामान्य मतदारांच्या हातात दिली. संविधान हे एका समाजापुरते नसून सर्व भारतीयांचे आहे. यामुळे देशात समता, बंधुता व स्वातंत्र्याचा भक्कम पाया निर्माण झाला.
मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली.
तसेच सुरेश बनसोडे म्हणाले की, संविधान दिन हा आपल्या सामाजिक बांधिलकीचा आणि अधिकार-जाणिवेचा प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे आमच्या आयुष्याचे दिशा-निर्देशक आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी संविधानाने मजबूत चौकट दिली आहे. आपण सर्वांनी संविधानातील मूल्यांचे जतन, पालन आणि प्रसार करण्याचे कार्य सातत्याने केले पाहिजे असल्याची भावना व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles