Friday, February 20, 2026

Ahilyanagar crime :डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवणुक प्रकरण ; तीन आरोपीना अटक

डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवणुक प्रकरणात अहिल्यानगर सायबरची मोठी कारवाई डिजिटल अरेस्ट प्रकरणात ३ (तीन) आरोपीना अटक

अहिल्यानगर सायबर पोलीस स्टेशनची कामगिरी

दिनांक ३१/१०/२०२५ रोजी फिर्यादी नामे संदिप हरिभाऊ कुलथे रा-सावेडी अहिल्यानगर यांची दिनांक २४/१०/२०२५ ते दिनांक २८/१०/२०२५ रोजी पावेतो वेगवेगळया मोबाईल नंबर वरुन फोन करुन व्हाट्सअॅप द्वारे व्हिडीओ कॉल करुन फिर्यादी यांना मुंबई सायबर सेल मधुन बोलत आहे असे सांगुन फिर्यादी यांचेविरुध्द मनि लॉड्रीग हवाला मनी अॅन्ड आयडेटी थेप्ट केस संदर्भात खोटे सांगुन फिर्यादी यांची फसवणुक करण्याकरीता डिजिटल अटक करुन फिर्यादी यांची ८,८०,०००/-रु ची फसवणुक केली आहे वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे गु.रजि.नं.१३/२०२५ भा.न्या.सं.३१८(४).३३६ (३), ३४० (२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा.श्री. सोमनाथ घार्गे साहेब पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी श्री. सागर ढिकले पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांना सदर गुन्हयाचा बारकाईने व सखोल तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार सदर गुन्हयाचे तपासकामी श्री. सागर ढिकले पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर यांचे अधिपत्याखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सुदाम काकडे, पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर, पोहेकों दिगंबर कारखेले, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ निळकंठ कारखेले, पोहेकॉ रावसाहेब हुसळे यांनी तांत्रिक व कौशल्यपुर्ण तपास करुन सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन पथकातील वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी निष्पन्न आरोपीपैकी आरोपी नामे १) विजय रंगनाथ चेमटे रा-भाळवणी ता-पारनेर जि-अहिल्यानगर, २) अभिजित अजिनाथ गिते रा-दादेगांव ता-आष्टी जि-विड हल्ली रा-प्रतिक प्लाझा, JSPM कॉलेज शेजारी नन्हे, पुणे, ३) अक्षय संजय तांबे रा-सलाबतपुर ता-नेवासा जि-अहिल्यानगर हल्ली रा-द्वारका पॅलेस लक्ष्मी चौक दत्त कॉलनी हिजवडी फेज वन पुणे यांना ताब्यात घेण्यात आले असुन सदर गुन्हयाचे अनुषंगाने यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असुन सदर गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपासकामी त्याना नमुद गुन्हयात अटक केले आहे. आरोपी यांना मा. न्यायालयात हजर केले असुन सदर आरोपी यांना दिनांक २९/११/२०२५ पर्यंत पो. कं. रिमांड मंजुर केली आहे. आरोपी यांचेकडुन आणखी इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास श्री. सागर ढिकले पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.श्री. सोमनाथ घार्गे साहेव पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबमें अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. दिलीप टिपरसे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सागर ढिकले, पोलीस उप निरीक्षक सुदाम काकडे, पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर, पोहेकों दिगंबर कारखेले, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ निळकंठ कारखेले, पोहेकॉ रावसाहेब हुसळे, पोकॉ अमोल आव्हाड यांचे पथकाने केलेली आहे.

सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे की, संशयास्पद अनोळखी लिक, कॉल, OTP किंवा अनोळखी व्यव्हारांवर विश्वास ठेवु नका.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles