Friday, February 20, 2026

Ahilyanagar crime news : तोतया महिला पोलीस अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

अहिल्यानगर -येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात नार्कोटिक्स शाखेची अधिकारी असल्याचे भासवून महिलेने एका टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. तपासकामाच्या नावाखाली महिलेने हा प्रकार केला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात स्नेहा सरे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) नामक महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फैसल अलीअजगर पिरमोहमंद झाडा (वय 30, रा. नालसाब चौक, झेंडीगेट, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. कार भाड्याने घेतली आणि प्रवासादरम्यान ऑनलाईन पैसे व भाडे मिळून एकूण 32 हजार 200 रूपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडली. मंगळवारी (25 नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहा नामक महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथील नार्कोटिक्स शाखेत अधिकारी असल्याची बतावणी केली.मला स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे मार्गे सीएसटी नार्कोटिक्स विभाग, मुंबई येथे तपासकामी जायचे आहे, असे सांगून तिने फिर्यादीची कार भाड्याने घेतली. अहिल्यानगर ते वाशी सेक्टर नं. 9 या प्रवासादरम्यान त्या महिलेने फिर्यादीकडून ऑनलाईन 25 हजार रूपये घेतले आणि गाडीचे भाडे 7 हजार 200 रूपये असे मिळून एकूण 32 हजार 200 रूपये मुंबईला पोहोचल्यावर रोख देण्याचे आश्वासन दिले. मात्र, वाशी येथे पोहोचल्यावर त्या महिलेने पैसे न देता आपला मोबाईल बंद करून टाकला आणि तेथून पसार झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेतली व गुन्हा दाखल केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles