Friday, February 20, 2026

Ahilyanagar crime :शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर -भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की करत त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.१२ वाजता ‘अजय ज्वलर्स’जवळील ग्रामीण गल्ली, भिंगार येथे घडली. आरोपींची नावे निलेश सुनिल पेंन्डुलकर, अजय सुरेश अंबीलवादे , प्रविण सुनिल पेंन्डुलकर अशी आहे. आरोपींच्या घरी सुरू असलेल्या घरगुती वादामुळे त्यांनी ‘डायल ११२’ वर कॉल करून मदत मागितली होती. त्यानुसार पोलीस अंमलदार प्रमोद मधुकर लहारे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना, आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण झाला. पोकॉ प्रमोद लहारे यांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles