Friday, February 20, 2026

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन दूर, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत नवी मोठी अपडेट

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही एक राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती, या योजनेचा मोठा लाभ महायुतीला झाल्याचं पहायला मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. दरम्यान जर राज्यात पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीत वाढ करू असं अश्वासन देखील त्यावेळी महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं, मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.दरम्यान आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या योजनेसाठी योजना सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या, मात्र आता पात्र नसलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या योजनेसाठी सरकारकडून केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान मध्यंतरी माध्यमांमधून एक बातमी समोर आली होती. ती म्हणजे केवायसीच्या प्राथमिक छाननीमध्ये 51 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, अशी ही बातमी होती, मात्र आदिती तटकरे यांनी या बातमीचं खंडण केलं आहे.

https://x.com/iAditiTatkare/status/1993261405072707654?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1993261405072707654%7Ctwgr%5Eefd410d8de44713059ca75c93742a84b37ab9422%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fladki-bahin-yojana-big-relief-to-women-beneficiaries-aditi-tatkare-gave-important-information-1545453.html

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles