Friday, February 20, 2026

मोठी बातमी: ठरलं! मुंबईसह 6 महापालिकेच्या निवडणुका उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र लढणार

मुंबई: माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (27 नोव्हेंबर) मनसेप्रमुख राज ठाकरेयांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिकेसह विध मुद्द्यांवर चर्चा झाली. राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट राज्यातील सहा महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. मुंबई महापालिकेसह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे, तर मनसेकडून अविनाश जाधव यांना जागा वाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार वरूण सरदेसाई यांच्याकडे जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी असणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका
ठाणे महानगरपालिका
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
नवी मुंबई महानगरपालिका
पुणे महानगरपालिका
नाशिक महानगरपालिका

मराठीबहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची सुत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मनसेकडून मागणी करण्यात आली आहे. तसंच ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्याच अनेक जागा मनसे मागत असल्याने ठाकरे गटाची गोची झाली आहे. परंतु मनसेची संबंधित प्रभागातील संघटनात्मक ताकद, तगडा उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम आहे. दादर माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठीबहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच सुरु आहे. कोण कुठून लढणार? याबाबत ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये काल ठोस तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही बंधुंमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या अपेक्षित आहेत. निवडून येवू शकणाऱ्या एकेका जागांवर सखोल चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles