लोणी येथील सराफ दुकानात जबरी चोरी करणारा कुख्यात गुंड अग्निशस्त्रासह अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने केला 12 तासात जेरबंद.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी राजेंद्र ताराचंद नागरे, वय – 54 वर्षे, व्यवसाय – सोनार रा. हसनापुर रोड, विठ्ठलप्रभा सोसायटी समोर, लोणी बु ाा, ता.राहाता, जि. अहिल्यानगर हे दिनांक 27/11/2025 रोजी दुपारी 12/20 वा.चे सुमारास त्यांचे लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानामध्ये असतांना, फिर्यादीचे ओळखीचे इसम बबन घावटे रा. श्रीगोंदा व त्याचे सोबतचे तीन अनोळखी इसम यांनी मारुती स्विप्ट कारमधुन फिर्यादीचे दुकानात येवुन, फिर्यादीचा मयत चुलतभाऊ उमेश नागरे याचा खुनाचा बदला घ्यायचा आहे. त्यासाठी पैशांची मागणी केली, तेव्हा फिर्यादी यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिले असता, आरोपीने त्याचे कमरेला खोसलेले पिस्तुल सारखे हत्याराचा धाक दाखवुन, संपुर्ण कुटुंबाला गोळ्या घालुन जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी देवुन, जबरदस्तीने दुकानाचे भिंतीस असलेले काचेचे ट्रेमधील 5 सोन्याचे नेकलेस ओढुन घेवुन, फिर्यादीशी झटापट करुन फिर्यादीस दुखापत करुन, सोन्याचे दागीने व मोबाईल फोन बळजबरीने हिसकावुन घेवुन गेले आहे. सदर घटनेबाबत लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 612/2025 बीएनएस कलम 309 (6), 3(5) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता.
मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि श्री. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.
नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोउपनि/ संदिप मुरकुटे, अनंत सालगुडे पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, दिपक घाटकर, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, रमीझराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, प्रशांत राठोड, मनोज साखरे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक महादेव भांड, अर्जुन बडे यांचे दोन पथक तयार करुन पथकास गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटना ठिकाणी भेट देवुन, तसेच घटना ठिकाणचे आजुबाजुचे रोडचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन, आरोपीबाबत माहिती संकलित करुन, आरोपीचे शोध घेत असतांना दिनांक 28/11/2025 रोजी रात्री पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी हे बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा रोडने ग्रे रंगाच्या स्विप्ट कार क्रमांक एम.एच.16. डी.एस.0516 या कारमधुन येणार असल्याची माहिती मिळाली. दोन्ही पथकाने सदर माहिती आधारे बेलवंडी फाटा येथे सापळा लावुन थांबले असता, बेलवंडी गावाकडुन पुणे-अहिल्यानगर हायवेकडे एक ग्रे रंगाची स्विप्ट कार येतांना दिसली, पथकाने गाडी थांबवण्याचा इशारा करुन, गाडी थांबवुन गाडीतील इसमांना बाहेर येण्यास सांगितले. गाडीतील इसम बाहेर असता, त्यांना ताब्यात घेवुन, पोलीसांची ओळख सांगुन त्यांचे नाव गाव विचारले असता, त्यांनी त्यांचे नांव 1) बबन भाऊसाहेब घावटे वय-33 वर्षे रा. राजापुर ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर 2) कृष्णा पोपट गायकवाड वय-35 वर्षे रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. बबन घावटे यास सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी लोणी येथे ताब्यातील स्विप्ट कारमध्ये 4 इसमांनी जावुन गुन्हा केल्याचे सांगितले. त्यास इतर दोन इसमाबाबत विचारले असता, त्यांनी त्यांचे नावे 3) संकेत जाधव रा. गोलेगाव ता.शिरुर, जि.पुणे (फरार) 4) करण खरात रा. हिंगणीता. श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर दोन पंचासमक्ष आरोपी व स्विप्ट गाडीची झडती घेतली असता, 55,000/- रुपये किंमतीचे 5 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, 25,000/- रुपये किंमतीची एक गावठी पिस्टल, 1400/- रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे व 7,00,000/- रुपये किंमतीची स्विप्ट कार गुन्ह्यात वापरलेली असा एकुण 7,81,400/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी नामे बबन भाऊसाहेब घावटे हा सराईत गुन्हेगार असुन तो सन 2014 मध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे हद्दीत जामखेड ते बीड जाणारे रोडवर मोहा नदीच्या पुलाजवळ त्याचे साथीदारासह त्याचे ताब्यातील मारुती इरटिगा गाडीने बीडकडे जाणा-या इनोव्हा गाडीचा पाठलाग करुन त्यातील इसमांना मारहाण करुन गावठी पिस्टलचा धाक दाखवुन गाडीतील एका इसमास धारदार हत्याराने भोसकुन जीवे ठार मारुन त्यांचेकडील इनोव्हा गाडी, सोने चांदीच्या आंगठ्या, मोबाईल फोन व रोख रक्कम असे जबरीने चोरुन नेल्याने त्याचेविरुध्द जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचेविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली असुन सदर आरोपीने याच पध्दतीने अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिस्टल व इतर हत्याराने धाक दाखवुन शरीराविरुध्द व मालाविरुध्दचे गुन्हे केले असल्याचे अभिलेखावरुन दिसुन येत आहे.
आरोपी नामे (1) बबन भाऊसाहेब घावटे त्याचेविरुध्द यापुर्वी खालीलप्रमाणे अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, एकुण 15 गुन्हे दाखल आहेत.
Ahilyanagar crime news: सराफ दुकानात जबरी चोरी; कुख्यात गुंड 12 तासांत जेरबंद
- Advertisement -


