Friday, February 20, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश, तब्बल २४ मोटारसायकली जप्त…..

नगर : अहिल्यानगर व नेवासा येथून चोरी केलेल्या मोटारसायकलींची भािंगरमधून विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून 24 मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या.

असिफ इकबाल सय्यद (रा. रंगारगल्ली,हल्ली रा.आलमगीर भिंगार) आणि आझाद ऊर्फ आज्या हारुन शेख (रा. प्रबुध्दनगर, आलमगीर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

शहरातून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी विशेष पथकाला तपासाचे निर्देश दिले. गुन्हे शोध शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश देशमुख यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे असिफ इकबाल सय्यदचा मागमूस शोधला. त्याला भिंगारमधून ताव्यात घेत चौकशी केली. मोटारसायकली चोरीची कबुली देत त्याने चोरीच्या मोटारसायकली आझाद ऊर्फ आज्या हारुन शेख याच्याकडे विक्रीसाठी ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी आज्याचा शोध घेतला असता तो जामखेडला असल्याचे समजले. पोलिस पथकाने जामखेडमधून आज्याला ताब्यात घेत चौकशी करता त्याने मोटारसायकली चोरीची कबुली दिली.दोघांची चोरी केलेल्या 24 मोटारसायकली हस्तगत केल्या. कोतवाली पोलिसांत दाखल मोटारसायकल चोरीच्या फिर्यादीची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी कोतवाली पोलिसांनी विभागीय प्रादेशीक परिवहन विभागाकडे पत्र व्यवहार केल्याचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles