Friday, February 20, 2026

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी; नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार?

डिसेंबर महिना सुरु झाला आहे. अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. नोव्हेंबर हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र येऊ शकतात. दरम्यान, राज्यात २ आणि ३ डिसेंबर रोजी नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका आहे. या काळात महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकत नाहीत. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता कमी आहे.

मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीआधी महिलांना दोन महिन्याचे पैसे एकत्र देण्यात आले होते. त्यामुळे यावेळीदेखील दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकी झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात पैसे येऊ शकतात.

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान आता केवायसी करण्यासाठी शेवटचे ३० दिवस उरले आहेत. केवायसीची डेडलाइन ३१ डिसेंबर आहे. त्यामुळे या महिन्याअखेरपर्यंत तुम्हाला हे काम करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles