Friday, February 20, 2026

निवडणुकीला हिंसक वळण; अजितदादांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर दगडफेक

नगरपरिषद आणि नगरपंचायतच निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. काही तासांत प्रचाराच्या तोफा थंडावतील, पण त्याआधी या निवडणुकीला हिंसक वळण लागले आहे.सांगलीमधील जतमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर दगडफेक करण्यात आली. काही अज्ञांत व्यक्तींनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावराच्या घरावर आणि गाडीवर दगड फेकून मारले. या घटनेत अद्याप कुणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही.पण गाडी आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू झाला आहे.सांगलीमधील जत नगरपरिषद निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पण त्याआधी जतमध्ये प्रचाराला हिंसक वळण लागेय. जतमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जतमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे काही अज्ञांत व्यक्तींकडून सुरेश शिंदे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. काही लोंकांनी शिंदेंच्या दगडफेक करत शिंदेंच्या कारच्या काचाही फोडल्या. सुरेश शिंदेंकडून याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करण्यात येत आहे. माजी आमदार विलासराव जगतापांनी या हल्ल्यामागे भाजप असल्याचा आरोप केला. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केला आहे.नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता होणार आहे. त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे २ डिसेंबर २०२५ रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत आहे. ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्या येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles