Saturday, February 21, 2026

जागतिक एड्स दिन निमित्ताने नगर शहरात सायकल रॅली द्वारे एच आय व्ही एड्स जनजागृती

जागतिक एड्स दिन निमित्ताने शहरात सायकल रॅली द्वारे एच आय व्ही एड्स जनजागृती

1 हा जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो या दिनाच्या निमित्ताने समाजातील विविध गटात वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग व त्यांच्या अंतर्गत असलेल्या सर्व सेवा केंद्रांच्या माध्यमातून केली जात आहे.

आज जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर या ठिकाणावरून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीस माननीय श्री योगेश पैठणकर -सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , डॉ. संजय घोगरे -जिल्हा शल्यचिकित्सक , डॉ. श्रीकांत पाठक अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक , डॉ. शिवशंकर वलांडे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बाह्य संपर्क , डॉ. साहेबराव डावरे प्रशासकीय अधिकारी ,श्री. शिवाजी जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी , डॉ. विक्रम पानसंबळ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

सायकल रॅली जिल्हा रुग्णालय येथून प्रारंभ करून शहरातील लोक वस्ती व गर्दी असलेल्या भागातून फिरवून घोषवाक्य बॅनर्स जनजागृती करण्यात आली.

सदर सायकल रॅलीमध्ये पेमराज सारडा महाविद्यालय, शासकीय नर्सिंग कॉलेज छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय , प्रयत्न नर्सिंग कॉलेज डॉ. विठ्ठलराव विखे पाटील , नर्सिंग कॉलेज इत्यादी महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी सहभागी झाले होते त्याचप्रमाणे विहान प्रकल्प कर्मचारी ,अमृत दीप प्रकल्प कर्मचारी ,स्नेहालय अंतर्गत सर्व प्रकल्प कर्मचारी सहभागी झाले होते.

तत्पूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात श्री योगेश पैठणकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी मार्गदर्शन केले त्यात एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना समानतेची वागणूक देण्याबाबत व कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करण्या बाबत सांगितले.

डॉ. संजय घोगरे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यात एच आय व्ही एड्स बाबत ज्या सोयी सुविधा आहेत त्या सांगून गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा तपासणी उपचार सर्व काही मोफत आहे तसेच या यंत्रणेत सर्व एचआयव्ही संसर्गित रुग्णांना चांगल्या पद्धतीची वागणूक दिली जाते आणि सर्व काही गोपनीय ठेवले जाते करिता या सोयी सुविधांचा वापर गरजूंनी करावा असे सांगितले.

प्रस्ताविक करताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री शिवाजी जाधव यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग अंतर्गत जिल्ह्यात एच आय व्ही एड्स जनजागृती करिता जे उपक्रम राबवले जातात त्याबाबतची माहिती दिली. विशेषता युवा वर्गां मध्ये एच आय व्ही एड्स जनजागृती करिता अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दलची माहिती दिली.
त्यानंतर एच आय व्ही एड्स प्रतिबंध संदेश देणारे पथनाट्याचे सादरीकरण यावेळेस करण्यात आले.
व रॅलीस प्रारंभ करण्यापूर्वी उपस्थितांना एच आय व्ही एड्स प्रतिबंध बाबतची शपथ देण्यात आली.

सदर कार्यक्रमास डॉ. कल्पना पोहरे वैद्यकीय अधिकारी, श्रीमती ज्योती लोंढे मेट्न, प्राचार्य परिचर्या प्रशिक्षण केंद्र, श्री प्रशांत येंडे अध्यक्ष एन ए डी पी प्लस ,श्री प्रवीण मुत्याल स्नेहालय प्रकल्प डॉ. शैलेश निकम ,पेमराज सारडा कॉलेज , श्री. इम्रान शेख सी पी ओ, इत्यादींचे प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नवनाथ लोखंडे यांनी केले.

कार्यक्रम आयोजनाकरिता श्री राधाकिसन पाटोळे ,श्री प्रवीण देठे, सविता बेलेकर ,राहुल कडूस ,दिनेश लोंढे ,शर्मिला कदम , तृप्ती मापारी, वाळू ईदे , श्री रणधीर भिसे ,श्री विजय राऊत ,श्री सागर फुलारी, वैशाली कुलकर्णी,रोहन भांबळ, दिपक बुरम, आकाश काळे, सागर विटकर, श्रीकांत शिरसाठ ,संजय कुताळ यांनी परिश्रम घेतले. तसेच यावेळी श्री Nick Cox , स्नेहालय हेही उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles