Saturday, February 21, 2026

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुणवंत दिव्यांग कर्मचारी गौरव सोहळा

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुणवंत दिव्यांग कर्मचारी गौरव सोहळा

सहा दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मंजूर-
साहेबराव अनाप

अहिल्यानगर- जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय विविध विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी 3 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद सभागृह, अहिल्यानगर येथे होणार आहे.या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक साहेब, योगेश पैठणकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत दादासाहेब गुंजाळ,मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल‌ शेळके, विवेक पाटील संभाजीनगर, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप यांनी दिली.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दरवर्षी अपंग कर्मचारी संघटनेमार्फत दिव्यांग कर्मचारी मार्गदर्शन कार्यशाळा व पुरस्कार वितरण समारंभ हा कार्यक्रम आयोजित केला जातो.जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये शारीरिक अडचणीवर मात करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार आहे. यावर्षी या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अहमदनगर जिल्हा परिषदेने 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर दिवसांची विशेष नैमित्तिक राजा मंजूर केली आहे. त्याचा सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष राजू आव्हाड व सचिव पोपटराव धामणे यांनी केले आहे.
गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार पुढील प्रमाणे
वैशाली साहेबराव शेळके, नागापूर, ज्योती एकनाथ जाधव, श्रीरामपूर, रोहिणी भगवानराव शिंदे नेवासा, संजय अंबादास ठोकळ कर्जत, विठ्ठल दगडू बांडे मान्हेरे अकोले, जिजाबाई गणपत बनकर नांदूर दैत्य पाथर्डी, अमोल वसंतराव कडू कोपरगाव नगरपालिका 5, मंगल वसंत वामन ,जवळके कोपरगाव, हिराबाई पांडुरंग लटांबळे आळकुटी, मेहबूब शेख शेवगाव,एकनाथ साबळे पोखरी हवेली संगमनेर, रुपेश वाणी धामणगाव जामखेड, अशोक निवृत्ती दांगडे मोरेवाडी श्रीगोंदा, अलका बाळासाहेब शिंदे विशेष शिक्षक शेंडी, ज्योती बाळासाहेब तवले महिला बालकल्याण पारनेर, संदीप जगन्नाथ आदमाने कलाशिक्षक माध्यमिक विभाग, चांद कादर शेख ,बाळू चेमटे परिचर आरोग्य विभाग आदी कर्मचाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यावेळी दिव्यांग कर्मचाऱ्यांना साधने व उपकरणे वाटप करणे, दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रमोशन व सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे, वाहन भत्याचे प्रस्ताव मंजूर करणे व सोयीने बदल्या करणे यावर यावेळी चर्चा होणार आहे.जागतिक दिव्यांग दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य सह कोषाध्यक्ष संतोष सरवदे ,कोषाध्यक्ष राजेंद्र औटी , श्रीकांत दळवी,उद्धव थोरात, बन्सी गुंड, राजेंद्र ठूबे, साहेबराव मले, रमेश शिंदे, विजय राऊत, अमोल चन्ने,किरण माने, शिवाजी आव्हाड, आबासाहेब बिडगर,गजानन मुंडलिक, अनिल घोलप, शिवाजी आव्हाड, सुनील मेचकर, भाऊराव नागरे, बळीराम जाधव, नारायण लहाने,खंडू बाचकर, अनिल ओहोळ, दादासाहेब गव्हाणे, रामकिसन डमाळे,विजय अंधारे, सचिन रनाते, अजय लगड आदींनी केले आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles