हल्ली सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. ज्यातील काही व्हिडीओ निरर्थक विषयांवर आधारित असतात, ज्याला व्ह्यूज लाखो असल्या तरीही त्यातून शिकण्यासारखे किंवा मनोरंजन होईल असे काहीच नसते. पण, अनेक युजर्स असेही असतात जे सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.
अनेक लहान मुलांना त्यांच्या बालपणापासूनच आपली आवडती कला कोणती, छंद कोणते हे कळतं; त्यामुळे ते लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेतात. सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी कोणी सुंदर डान्स करताना दिसतं तर कधी कोणी सुमधूर आवाजात गाणं गाताना दिसतं. शिवाय अनेक जण अभिनयही करताना दिसतात. सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात ती खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली तिच्या डान्स क्लासमध्ये आपल्या डान्स शिकवणाऱ्या शिक्षिकेसह सुंदर डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्या दोघीही सलमान खानच्या “मेरे रंग में रंगने वाली” या बॉलीवूड चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स लक्ष वेधून घेत आहे. शिवाय तिची शिक्षिकादेखील अतिशय सुंदर डान्स करत आहे.हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @barkat.arora या अकाउंटवर शेअर करण्यात आला


