Saturday, March 7, 2026

अहिल्यानगर शहरात चायना मांज्यासह 1 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर – विक्रीस बंदी असलेला, पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास इजा करणारा प्लास्टीक नायलॉनचा चायना मांज्याची विक्री करणा-यासाठी घेवुन जाणा-या आरोपीकडुन 1,85,000रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. ही कारवाई 1 डिसेंबरला केडगाव येथे करण्यात आली.
याबाबत हकिगत अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 01/12/2025 रोजी अहिल्यानगर शहरात पेट्रोलिंग फिरुन प्लास्टीक किंवा नायलॉन चायना मांजा विक्री करणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास अहिल्यानगर शहरातील जी.एल.पी. टॉवर लिंकरोड केडगांव या ठिकाणी होंडा कंपनीची विना नंबरची ऍ़क्टीवार एक इसम त्याचे पाठीमागे दोन बॉक्स बांधुन घेवुन जात असतांना दिसला. तेव्हा पथकाने त्यास थांबवुन पोलीसांची ओळख सांगुन त्याचे नांव गाव विचारले असता, त्याने त्याचे नांव विशाल कुमार दळवी वय – 30 वर्षे रा. आरती रो हाऊसिंग भुषणनगर केडगांव ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यास सदर बॉक्समध्ये काय आहे. याबाबत विचारपुस करता त्याने सदर बॉक्समध्ये नायलॉन मांजा असुन ते विक्री करण्यासाठी घेवुन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यातील इसमाचे कब्जातुन 1,10,000 रुपये किंमतीची 110 नग मोनो काईट, मोनो फायटर व गोल्ड असे नाव असलेले प्लास्टिक नायलॉन मांजा, 75,000 रु कि.ची एक मोटार सायकल असा एकुण 1,85,000 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याचेविरुध्द पोहेकॉ सुनिल विनायक पवार नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाणे गु.र.नं. 1093/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 125 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम क. 5, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहेत.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचेपोनि किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सुनिल पवार, संतोष खैरे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दिपक घाटकर, बिरप्पा करमल महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles