सावळा गोंधळ….बटण पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं अन् लाइट पेटली भलतीकडे; संतापलेल्या मतदाराने ईव्हीएम फोडलं

राज्यातील विविध ठिकाणी नगरपालिकांच्या मतदानाच्या दिवशी सावळा गोंधळ पाहायला मिळाला. काही ठिकाणी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काही भागातील मतदान क्रेंद्रावर मशीन देखील बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाल्याचं दिसून आलं. चंद्रपूरमध्ये एका मतदाराने थेट ईव्हीएम मशीनच फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

चंद्रपूरच्या गडचांदूर येथे मतदानादरम्यान एका मतदाराने ईव्हीएम फोडल्याचे समोर आलं. गडचांदूरमधील प्रभाग क्रमांक ९ मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली. राम दुर्गे असं ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराचे नाव आहे. त्याने पंसतीच्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबलं. मात्र, यावेळी भलत्याच्या उमेदवाराच्या चिन्हाची लाईट लागली, असा आरोप ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराने केला.

ईव्हीएम फोडल्यानंतर मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली. मतदारांमध्येही एकच पळपळ झाली. मतदान केंद्रावरील कर्मचारी देखील घाबरून गेले. या प्रकारानंतर पोलिसांनी राम दुर्गे याला ताब्यात घेतलं. नवीन ईव्हीएम लावून मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अकलूज नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ७ मधील मतदान प्रक्रिया सुरू असताना धक्कादायक प्रकार घडला. बटन दाबले जात नाही, या कारणाने अंबादास पाटोळे या भाजप महिला उमेदवाराच्या पतीने बॅलेट युनिट उचलून फेकल्याची घटना घडली. या घटनेनंतर अकलूजमध्ये प्रभाग क्रमांक सात आणि परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. यानंतर प्रभाग क्रमांक ७ मधील क्रांतीसिंह माने पाटील या उमेदवाराने बॅलेट युनिट मशीनची तपासणी करून एक तास वाढीव मतदानाला वेळ द्यावा, अशी मागणी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles