अहिल्यानगर शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी ; युवकाविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर-येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून, धमकावून आणि वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. अत्याचार करणारा संशयित युवकाची इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर तो पीडितेला वारंवार त्रास देत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने (वय 15) सोमवारी (1 डिसेंबर) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी युवकाविरूध्द विनयभंग, अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलगी अहिल्यानगर येथील एका शाळेत शिक्षण घेते.इंस्टाग्रामवरून तिची आरोपीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने मुलीच्या शाळेजवळ येऊन तिचा पाठलाग करणे सुरू केले. 17 जुलै 2025 रोजी सायंकाळी मुलीला थांबवून आरोपीने तिचा हात धरून तिला ओढण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यावर आरोपीने तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर त्याने मुलीला अनेक वेळा शाळा सुटल्यावर धमकावून आपल्या दुचाकीवरून घेऊन जात होता. तपोवन रस्ता परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी नेऊन त्याने तिच्यासोबत गैरवर्तन केले.

27 ऑक्टोबर 2025 रोजी मुलीचे पेपर सुरू असताना, तिला पुन्हा धमकी देऊन तपोवन रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या घरी नेले. तेथे जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. विरोध केल्यावर तिला मारहाणही केली. यानंतर 28 आणि 29 ऑक्टोबर तसेच 21 आणि 24 नोव्हेंबर या दिवशीही आरोपीने मुलीला धमकावून याच ठिकाणी नेऊन अत्याचार केले. आरोपीने पीडितेला आणि तिच्या पालकांना गायब करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संपूर्ण प्रकारानंतर अल्पवयीन पीडितेने धाडस करून आईच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles