Thursday, February 19, 2026

जेव्हा आवडत्या मुलीबरोबर लग्न ठरतं! लग्नात नवरदेवाचा भन्नाट डान्स; मित्र थिरकले व्हिडीओ …

लग्न करण्यासाठी आपल्यातील बरेच जण उत्सुक असतात. पण, हेच लग्न जेव्हा आवडत्या व्यक्तीबरोबर होतं; तेव्हा त्यांचा आनंद जगावेगळा असतो. कारण अनेक वर्षांपासून एखाद्या रिलेशनशिपचा प्रवास आता एका महत्वाच्या नवरा-बायकोच्या नात्यात बदलणार असतो. त्यासाठी नव्या नवरी नवरदेवासाठी भन्नाट डान्स करत एंट्री करतात. पण, आज आज सोशल मीडियावर अनोखा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये नवऱ्याने मित्रांच्या सांगण्यावरून नवरीसाठी भन्नाट डान्स केलेला दिसतो आहे.

नवरदेवाचे मित्र भेटवस्तू द्यायला स्टेजवर येतात. तेव्हा सगळेच मित्र नवरदेवाला डान्स करण्यास सांगता. सुरवातीला नाही नाही म्हणणारा नवरा ‘तुला बघुन बघुन गेलोया दंगुन’ गाण्यावर डान्स करण्यास तयार होतो. पटकन डोळ्यावर गॉगल लावतो आणि या गाण्यावरचे हुबेहूब डान्स स्टेप्स करण्यास सुरुवात करतो. भन्नाट डान्स पाहून सगळे मित्र त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत तर नवरी हसून लाल झाली आहे.लग्न एखादाच होतं; त्यामुळे लग्न ठरलेल्या जोडप्यांनी स्वतःचे लग्नात मजा-मस्ती करणेही गरजेचे असते. तुम्ही पाहिलं असेल सुरवातीला नाही, नाही म्हणणारा नवरदेव मित्रांच्या सांगण्यावरून डान्स करायला तयार झाला. नवरीसमोर बसून, तिच्याकडे बघून अशा भन्नाट स्टेप्स केल्या की, आजूबाजूचे सुद्धा गाण्यावर थिरकताना दिसले आहेत. नवरदेवाने नवरीसाठी केलेला भन्नाट डान्स व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mstinstaofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “जेव्हा आवडत्या मुलीबरोबर लग्न होतं” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून त्यांच्या मित्रांना टॅग करताना दिसत आहेत आणि “खूपच भारी भावा”, “मस्त डान्स केला”, “स्टेप्स मस्त केल्यात” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles