प्रत्येक बहिणीला आपल्या लग्नात आपल्या भावाने काहीतरी खास करावं अशी इच्छा असते. काहीजण बहिणीला सुंदर गिफ्ट देतात तर काहीजण तिच्यासाठी सरप्राइज तयार करतात. भावा–बहिणीचं नातं हेच असतं, बालपणीच्या भांडणांपासून ते पुढे आयुष्यभर साथ देण्यापर्यंत खूप प्रेमाने जोडलेलं अस हे नातं असतं. सध्या सोशल मीडियावर असाच भावूक करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका भावाने आपल्या बहिणीला तिच्या लग्नाच्या दिवशी असं अप्रतिम गिफ्ट दिलं की पाहणाऱ्यांच्या डोळ्यांतही पाणी आलं.
व्हायरल व्हिडीओ हा एका लग्नातील खास क्षणावर आधारित आहे. बहिणीला तिच्या लग्नाच्या दिवशी भावाकडून मिळालेल्या सरप्राइज गिफ्टचा हा व्हिडीओ आहे. बहिणीचं लग्न सुरू असताना तिजा भाऊ तिला एक खास बॉक्स उघडायला सांगतो आणि त्यानंतर समोर उघडतो तो क्षण, ज्यामुळे बहीण म्हणजेच नवरी थक्क होते. व्हिडीओमध्ये भाऊ म्हणतो की, “आजपर्यंत काही गिफ्ट दिलं नाही, पण आज देणार आहे,” आणि हे गिफ्ट पाहून बहिणीच्या चेहऱ्यावरचं उत्तर पाहण्यासारखं असतं.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओची सुरुवात नवरीच्या एका छोट्या व्हिडीओने होते. त्यात ती म्हणते की, “माझ्या भावाने मला आजवर कधीच गिफ्ट दिलं नाही.” यानंतर लगेच तिचा भाऊ स्क्रीनवर दिसतो आणि म्हणतो, “आजवर गिफ्ट नाही दिलं, पण आज देतोय.” पुढच्या शॉटमध्ये लग्नातील सीन येतो.नवरी आणि नवरदेव एका मोठ्या फोल्ड होणाऱ्या बॉक्सपाशी उभे असतात. नवरी बॉक्सचा रिबन उघडते आणि लगेचच समोर एक मोठं सरप्राइज उभं राहतं. बॉक्स उघडल्यानंतर लाल कापडाने झाकलेली एकदम नवीन BMW 2-Series Sedan दिसते. कारभोवती रंगीबेरंगी फुगे आहेत आणि तो क्षण पाहताच नवरी म्हणजेच त्याची बहीण आनंदाने हसत असते .
काही सेकंदांतच ती आपल्या भावाच्या गळ्यात जाऊन भावूक होते. हा भावनिक क्षण पाहून कुटुंबातील सर्व जण आणि लग्नात उपस्थित पाहुणेही भावूक होतात. व्हिडीओत दिसणारी ही कार BMW 220i Gran Coupe M Sport Pro असून आधी उपलब्ध असलेले हे मॉडेल आता बंद झाले आहे. जेव्हा हे मॉडेल विक्रीला होते, तेव्हा त्याची किंमत तब्बल 55 लाख रुपये होती.हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर Deoshri & Mayank नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला


