प्रेमविवाह नंतर सासू सासऱ्याच्या जाच; तरुणाची आत्महत्या! अहिल्यानगर शहरातील घटना

अहिल्यानगर -प्रेमविवाह केलेल्या पत्नीस माहेरी बोलावून घेऊन तिला नांदण्यास पाठवण्यास नकार दिला. पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा सासू, सासऱ्याकडून वारंवार छळ केल्याने, अखेर या जाचास कंटाळून अहिल्यानगर येथील एका 32 वषय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाच्या बहिणीने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये विवाहितेचे वडील आणि आई यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

अक्षय अशोक उमाप (वय 32, रा. सर्जेपुरा, अहिल्यानगर) याचा आणि प्रेरणा (नाव बदललेले) यांचा 4 एप्रिल 2025 रोजी पुण्यात प्रेमविवाह झाला होता. मुलीच्या आई-वडिलांचा या विवाहास विरोध असल्याने ते लग्नाला आले नव्हते. लग्नानंतर हे दाम्पत्य सर्जेपुऱ्यातील आजीच्या घरी एकत्र राहत होते. ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या भाऊबीजेसाठी अक्षयची बहीण आकांक्षा पवार हिने दोघांनाही पिंपळगाव माळवी येथील घरी बोलावले होते. त्याच दिवशी सायंकाळी प्रेरणाचे आई-वडील तिथे आले आणि त्यांनी पहिली दिवाळी असल्याने तिला माहेरी पाठवा, दोन दिवसांनी परत आणून घालतो, असे सांगून मुलीला सोबत घेऊन गेले.

यानंतरही त्यांनी प्रेरणाला नांदायला पाठवले नाही. अक्षय व त्याच्या बहिणीने फोन करून विचारणा केली असता, आम्ही तिचे दुसरे लग्न जमवले आहे, तुम्ही फोन करू नका,असे धमकावले. अक्षयने पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, मला घरच्यांनी बाहेरगावी लपवून ठेवले आहे, असे तिने संदेशाद्वारे सांगितले.नोव्हेंबरमध्ये अक्षय पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडी कुकाणा (देवसडे, ता. नेवासा) येथे गेला असता, तिच्या आई-वडिलांनी त्याला मारहाण करून हाकलून दिले. 3 डिसेंबरलाही तो पत्नीला भेटण्यासाठी गेला असता, पुन्हा त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याला पत्नीला भेटू दिले नाही.

या सततच्या छळाला कंटाळून, अक्षयने 4 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता सर्जेपुरा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मरण्यापूव त्याने चिठ्ठी आणि व्हिडिओ क्लिपमध्ये प्रेरणाच्या आई-वडिलांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले आहे.मृत तरुणाच्या बहिणी आकांक्षा पवार (वय 30) यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये विवाहितेचे वडील सुनील मंडलिक आणि आई ज्योती मंडलिक (दोघे रा. देवसडे कुकाणा, ता. नेवासा) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक गोंटला पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles