Saturday, February 21, 2026

प्रभाग क्र.३,सहकारनगर येथे योगीराज गाडे आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग क्र.३,सहकारनगर येथे योगीराज गाडे आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर-प्रभाग क्र.३, सहकारनगर,तीन मंदिर परिसरात आज आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.विविध वैद्यकीय तपासण्या,नेत्र तपासणी,मोतीबिंदू निदान,चष्मा वितरण, सांधेदुखी–गुडघेदुखी तपासणी तसेच सर्वसाधारण आजारांवरील उपचार यांचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला.

या उपक्रमासाठी साईमहालक्ष्मी हॉस्पिटल आणि अंजली चष्मावाला यांच्या वैद्यकीय तज्ञांनी उत्कृष्ट सेवा दिली. शिबिराचे नियोजन आणि आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमास शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपसचिव युवासेना श्री. विक्रम राठोड, तसेच शेखर तुंगार, सचिन खतवकर, राजेंद्र भगत, अम्बादास शिंदे, संदीप थोम्बरे, गिरीश हांडे, प्रथमेश महिंदरकर, राज गोरे, वैभव सांगळे, मोहित मिश्रा, रितेश गायकवाड, प्रशांत पाटील, रमेश्वर सोलट, प्रशांत दरकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेबद्दल बोलताना आयोजक मा. योगीराज गाडे म्हणाले की,“नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी असे उपक्रम नियमितपणे राबवले जातील. सहकार नगर आणि प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांनी दाखवलेला प्रतिसाद खरोखर प्रेरणादायी आहे. समाजाच्या आरोग्यवृद्धीसाठी आपण सर्व मिळून आणखी प्रभावी काम करू.” नागरिकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे भविष्यात आणखी व्यापक आरोग्यसेवा उपक्रम राबविण्याची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles