Saturday, February 21, 2026

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ,उद्धव ठाकरेंनी घेतली महत्त्वाची बैठक

राज्यात नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान झाले असून शेकडो नगराध्यक्ष आणि हजारांहून अधिक नगरसेवकांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आता, सर्वांनाच उत्सुकता आहे ती 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाची. नगरपालिका निकालानंतर राज्यात पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज महाराष्ट्रातील पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखांची मुंबईतील शिवसेना भवन येथे बैठक घेतली. त्यामध्ये, स्थानिक राजकारणात शिवसेनेची तयारी आणि मनसेसोबतच्या युतीवरही भाष्य केलं. दरम्यान, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात उद्धव ठाकरे उतरले नसल्याचं पाहायला मिळालं.

जिल्हा परिषद पंचायते समिती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांची जिल्हा संपर्कप्रमुखांसोबत शिवसेना सेना भवन या ठिकाणी बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सर्वच जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केले. पंचायत समिती जिल्हा परिषद गट आणि गण यामध्ये पक्षाचे उमेदवार मजबूत आहेत का? सोबत महाविकास आघाडी म्हणून तो उमेदवार सर्वाना पसंत आहेत का? गण आणि गटाची ताकद किती? त्यात मनसेची ताकद किती? या सर्व बाबींचा आढावा घेण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हा संपर्क प्रमुखांना केल्या आहेत.

आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या अनुषंगानेही उद्धव ठाकरेंनी चर्चे केली. त्यामध्ये, महापालिकेतील प्रभागात सध्याचा नगरसेवक कोणता? त्या विभागात आपली किती आहे, तसेच महाविकास आघाडी म्हणून कुठला उमेदवार सक्षम यासंदर्भातील आढावा घेऊन एक रिपोर्ट सादर करण्याचे बजावले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर झालेल्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्याचेही उद्धव ठाकरेंनी सूचवले. ग्राउंड लेव्हलला आपले पदाधिकारी व शाखाप्रमुख कोण आहेत? किती जागा रिक्त आहेत आणि त्यांचे कार्यक्षेत्र काय, कुठे काम करत आहेत? या सर्व बाबींचा देखील आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील उद्धव ठाकरेंनी जिल्हा संपर्कप्रमुखांना केल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles