जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी दिव्यांग कर्मचारी संघटनेचा रविवारी मेळावा
नगर: महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या शाखा अहिल्यानगर तर्फे नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत हा मेळावा होणार आहे. या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील व विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे उपस्थित राहून कार्यकारणीला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती राज्य सहकोष अध्यक्ष संतोष सरवदे यांनी दिली .
मागील कार्यकारिणीची मुदत संपली आहे. संघटनेची नवीन जिल्हा कार्यकारिणी तथा तालुका कार्यकारणी निवडण्यासाठी आणि आगामी कार्याची दिशा निश्चित करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन कार्यकारिणी पुढील दोन वर्षे संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेईल. मेळाव्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व सक्रिय सदस्य, पदाधिकारी आणि इच्छुक कार्यकत्यांनी उपस्थित रहावे, येताना यू डी आय डी कार्ड आणि त्रिस्तरीय ऑनलाईन प्रमाणपत्राची झेरॉक्स घेऊन यावे. संघटनेच्या बळकटीकरणासाठी व भविष्यात समोर येणाऱ्या समस्यांना म्हणजेच वारंवार प्रशासनाकडून तपासणीला पाठवणे, कायम दिव्यांगात्वावर बोट ठेवणे या सर्व अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद सीईओ आनंद भंडारी यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून घेण्यासाठी कायम दिव्यांगत्व असणाऱ्याची यादी निश्चित करण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे.


