अहिल्यानगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथुन पुणेकडे तसेच अहिल्यानगर कडुन सरळ पुणे कडे जाणारे सर्व प्रकारची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविलेबाबत.
पुणे जिल्हयातील लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत मौजे पेरणे, ता. हवेली, जि. पुणे येथे दि. ०१/०१/२०२६ रोजी जयस्तंभकार्यक्रम होणार असुन सदर जयस्तंभ पेरणे यथे मानवंदना देणेकरीता मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होणार आहे. जयस्तंभ पेरणे येथे मानवंदना दिल्यानंतर त्यातील लाखोंच्या संख्येने लोक मौजे वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी भेट देवुन समाधीचे दर्शन घेत असतात. जयस्तंभ पेरणे येथील कार्यक्रम अहिल्यानगर पुणे महामार्गालगत असुन कार्यक्रमाकरीता येणारे नागरीकांमुळे सदर महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होवुन मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अहिल्यानगर पुणे महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असुन सदर महामार्गावरील वाहनाचा कार्यक्रमाकरीता आलेले नागरीकांना धक्का लागुन, अपघात होवुन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दि. ३१/१२/२०२५ रोजीचे ००.०१ ते दि. ०२/०१/२०२६ रोजीचे ०६.०० वा. पावेतो अहिल्यानगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथुन पुणेकडे जाणारी वाहतुक तसेच अहिल्यानगर कडुन सरळ पुणे कडे जाणारे सर्व प्रकारची वाहतुक खालील पर्यायी मार्गाने वळविणे वळविणे नियोजित आहे.
१) अहिल्यानगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथुन पुणे कडे जाणारे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग –
बेलवंडी फाटा – देव दैठन धावलगाव – पिंपरी कोळंडर – उक्कडगाव- बेलवंडी अहिल्यानगर दौंड महामार्गावरुन – लोणी व्यंकनाथ मढे वडगाव काष्टी दौंड सोलापुर पुणे महामार्गे मार्गे – पुणे कडे –
२) अहिल्यानगर कडुन सरळ पुणेकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकी करीता पर्यायी मार्ग –
कायनेटीक चौक / केडगाव बायपास अरणगाव बायपास कोळगाव-लोणी व्यंकनाथ मढे वडगाव – काष्टी -दौंड – सोलापुर पुणे महामार्गा मार्गे – पुणे कडे
३) अहिल्यानगर कडुन पुणे मार्गे मंबई, नवी मुंबई, ठाणेकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग –
कल्याण बायपास – आळेफाटा ओतुर माळशेज घाट मार्गे
बेलवंडी फाटा येथुन पुणेकडे जाणारे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असुन त्यांनी उपरोक्त मार्गाचा अवलंब करावा.
प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, जय स्तंभास अभिवादन करणेकामी जाणारे नागरीकांची वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.
उपरोक्त आदेशचे पालन करुन नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्या करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी अवाहन केले आहे.


