अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज; लग्नात नवरा-नवरीची एन्ट्री हा विषय अगदी चर्चेचा ठरतो. लाजत मान खाली घालून; नाही तर लग्नाचा खास दिवस उत्साहाने साजरा करण्यासाठी डान्स करत, डोलीत बसून, घोड्यावरून बसून नाचत-गात हॉलमध्ये प्रवेश करतात. तर सध्या सोशल मीडियावर सुद्धा अशाच नवरा-नवरीच्या हटके एण्ट्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
नवरा-नवरी रिक्षातून एण्ट्री घेत हॉलमध्ये आले आहेत. रिक्षात प्रवासी बसतात त्यांचे छत उघडे ठेवून नवरा-नवरी त्यामध्ये उभे आहेत आणि अगदी हसत, नाचत, गात हॉलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. जोडप्याची अनोखी एण्ट्री पाहून अगदी फोटोग्राफर सुद्धा धावत रिक्षाजवळ जातात आणि पाहुणे मंडळीही अगदी उत्साहाने त्यांच्या कडे बघायला लागतात.
लग्नाचे रिसेप्शन म्हटलं की, जोडप्याची एण्ट्री लक्षवेधी झालीच पाहिजे नाही का. मग त्यासाठी घोडा, महागड्या गाड्या किंवा अगदी बाईकवरून जबरदस्त एण्ट्री होते. पण, या जोडप्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेऊन काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी सुद्धा झाला आहे. नवरा-नवरीने व्हाईट गाऊन आणि काळा कोट घालून रिक्षातून हॉलमध्ये एण्ट्री घेतली.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mrpaidtotalkridge या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.


