Friday, February 20, 2026

बायकोसाठी आणि काय हवं? बायकोसाठी रिक्षात ‘त्याने’ काय लावलं बघा व्हिडीओ…

प्रेम अशी गोष्ट आहे की ज्याचं आकर्षण प्रत्येकाला असते. प्रत्येकाला वाटते की, आपल्याही आयुष्यात प्रेमळ जोडीदार असावा. पण प्रेम म्हणजे रोमान्स का? तर नाही… न सांगता फुल, गजरा आणून देणे, महिन्याचा पगार हातात देणे, भरपावसात हात पकडून नाचणे, फोटो पाकिटात ठेवणे अशा छोट्या छोट्या गोष्टी करूनही तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दलचे प्रेम अगदी सहज व्यक्त करू शकता. तर आज सोशल मीडियावर असेच काहीसे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

@rupalisingh27 रुपाली नावाची इन्स्टाग्राम युजर रिक्षातून प्रवास करत होती. यादरम्यान तिला एक अनोखी गोष्ट दिसली. रिक्षात रिक्षा चालकाच्या समोर त्याच्या बायकोचा फोटो आणि वर तिचे नाव ‘रेशमा’ चिटकवून घेतलेले असते. बायको सतत डोळ्यासमोर दिसावी यासाठी त्याने या खास गोष्टी रिक्षात लावून घेतल्या आहेत. ही गोष्ट पाहून प्रवासी रुपाली भारावून जाते आणि व्हिडीओ काढण्यास सुरुवात करते. रिक्षा चालकाचे बायकोवर किती प्रेम असते हे त्याच्या कृतीतून अगदी स्पष्टपणे दिसते आहे.प्रेम व्यक्त करण्यासाठी सध्याची मंडळी आय लव्ह यू या शब्दांचा वापर करतात. पण पूर्वीची मंडळी व्हिडीओत दिसतंय त्याप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी करून प्रेम व्यक्त करून मोकळी होतात. त्यामुळे भेटवस्तू किंवा आय लव्ह यू म्हणण्याने नाही तर नातं नेटाने निभावलं तर आयुष्यात सगळ्या गोष्टींची कमतरता भरून काढता येते असा संदेश हा व्हिडीओ देतो आहे. रिक्षा चालकाने रिक्षात कशाप्रकारे आपल्या बायकोचा फोटो लावून ठेवला आहे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…


सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rupalisingh27 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles